कच्छमध्ये राहणाऱ्या उपेद्र गोस्वामी यांच्या घरी काही महिन्यांपूर्वी एक मांजर आलं. आपली दिवंगत बहिणच मांजरीच्या रुपात परत आल्याचं त्यांना वाटलं आणि त्यांनी माजरांसोबत राहायला सुरुवात केली.
या बागेच्या देखभालीसाठी त्यांना दरमहा 1.5 लाख रुपयांचा खर्च येतो. गोस्वामी आणि त्यांची पत्नी पूजा दोघेही या मांजरींची देखभाल करतात.
मांजरप्रेमींसाठी ही बाग दर रविवारी खुली असते. आजूबाजूच्या भागातील मांजरप्रेमी या बागेला भेट देतात.
शाळेच्या मुख्याध्यापिका असणाऱ्या पूजा पहाटे पाच वाजता उठून सर्व माजरांना नाश्ता देतात. त्यानंतर दुपारी दीड वाजता शाळेतून परत आल्यावर त्यांना जेवण देतात.
पिलांना जन्म देण्याची जागादेखील मांजरांनी ठरवून घेतली असून सर्व मांजर त्याच ठिकाणी पिलांना जन्म देतात.