Home » photogallery » explainer » WHO IS LADY JUSTICE SIGNIFICANCE OF SYMBOLS WOMEN JUDGES IN INDIA AND WORLD MH PR

डोळ्यांवर पट्टी आणि हातात तराजू असलेली न्यायदेवता कुठून आली? काय आहे त्याचा अर्थ?

मानवी इतिहासात, इजिप्शियन, ग्रीक आणि रोमन कालखंडातील न्यायदेवतेचा (Lady Justice) उल्लेख आढळतो, जिच्या एका हातात तराजू आणि डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. जगातील अनेक देशांमध्ये, या पौराणिक पात्रांच्या आधारे, न्यायदेवतेची मूर्ती प्रचलित असल्याचे मानले जाते, ज्याचा उल्लेख न्यायालयीन खोल्या (Court rooms), न्याय पुस्तक इत्यादींमध्ये आढळतो. पण कधी-कधी अशी टीकाही केली जाते की, न्यायदेवता आहे, पण न्यायालयांमध्ये सर्वोच्च पदांवर महिला न्यायाधीशांची संख्या खूपच कमी आहे.

  • |