अमेरिकेतील (USA) केंटकीमध्ये टॉर्नेडोने (Tornedo) हाहाःकार उडाला आहे. 200 किमीच्या क्षेत्रात आलेल्या या वादळामध्ये सुमारे 200 लोकांचा मृत्यू झाला. या चक्रीवादळांनी समोर आलेल्या सर्व गोष्टींना उद्धवस्त केलं. या घटनेने पुन्हा एकदा टॉर्नेडो चर्चेत आलं आहे. या घटनेचे रूप इतके भयावह होते की, ढिगाऱ्याखाली क्वचितच कोणीही जिवंत राहिले असते, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. टोर्नेडो हे युनायटेड स्टेट्समध्ये दिसणारे विनाशकारी हंगामी वादळ (Strom) आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसनुसार (National Weather Services) चक्रीवादळे जगात कधीही येऊ शकत असली तरी अमेरिकेत सर्वाधिक संख्येने येतात. अमेरिकेत, कॅन्सस, ओक्लाहोमा, टेक्सास यांसारख्या मैदानी भागात बहुतेकदा चक्रीवादळे येतात. यानंतर ते रॉकी पर्वतश्रेणीच्या भागात सामान्य आहेत. ही शक्तिशाली वादळे नेमकी कशी तयार होतात याचा शोध शास्त्रज्ञांनाही लावता आलेला नाही. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
अमेरिकेच्या नॅशनल ओशनिक अँड अॅटमॉस्फेरिक अॅडमिनिस्ट्रेशनचा (NOAA) भाग असलेल्या नॅशनल स्टॉर्म लॅबोरेटरीनुसार, अनेक चक्रीवादळं ही अद्याप गूढ राहिली आहेत. यांचा अंदाज लावणे कठीण आहे. ते दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सच्या मालमत्तेचे नुकसान करू शकतात. नोआच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत जे काही ज्ञात आहे त्यानुसार, गडगडाटी वादळांमुळे चक्रीवादळ तयार होतात, ज्यामध्ये वाढत्या हवेचा प्रवाह तयार होतो. (प्रतीक फोटो: PREMIO STOCK / Shutterstock)
NOAA विश्लेषणानुसार, वादळाच्या आत वरच्या दिशेने जाणारा अतिशय शक्तीशाली वारा असतो, जो सिलेंडरसारखा आकार घेतो. वाढती हवा फिरणारा सिलेंडर उचलते. हवेचा हा सिलेंडर तळाशी पातळ असतो आणि तो वरच्या बाजूस मोठा होऊन खूप वेगाने फिरू लागतो, ज्याला टॉर्नेडो म्हणतात. NWS म्हणते की चक्रीवादळ खूप वेगाने विकसित आणि गायब होते. अशी वादळं 15 मिनिटे टिकू शकतात. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
टॉर्नेडो त्याच्या विनाशकारी वृत्तीसाठी प्रसिद्ध आहे. NWS नुसार, निसर्गातील बहुतेक चक्रीवादळ हे तीव्र वादळ असतात, ज्यात वारा 500 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहतो. ते 50 मैल लांब आणि एक मैल रुंद मार्गावर त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीचा नाश करतात. 11 डिसेंबर रोजी आलेला विनाशकारी चक्रीवादळ जमिनीवर 227 मैल चालला होता. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
NOAA च्या आकडेवारीनुसार अमेरिकेत दरवर्षी चक्रीवादळामुळे 50 लोकांचा जीव जातो. अलीकडील इतिहासात, 2011 च्या वसंत ऋतूमध्ये अतिशय विनाशकारी चक्रीवादळ दिसले ज्यात एप्रिल आणि जूनमध्ये 580 पेक्षा जास्त लोकांचा जीव गेला. त्यांनी 21 अब्ज डॉलर्सचे नुकसान केल्याचा अंदाज आहे. चक्रीवादळ संपल्यानंतर शास्त्रज्ञ वाऱ्याचा वेग आणि होणारे नुकसान यावरून त्याची शक्ती मोजतात. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)
चक्रीवादळ निर्माण करणारी परिस्थिती कुठेतरी हवामान बदलाशीही (Climate Change) संबंधित असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. या चक्रीवादळाच्या निर्मितीमागील कारण म्हणजे विलक्षण उबदार तापमान आणि पूर्वेकडील वादळांची प्रणाली असल्याचे सांगितले जाते. यामुळे विनाशकारी चक्रीवादळ निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. (प्रतिकात्मक फोटो: शटरस्टॉक)