झी मराठीवरील 'येऊ कशी कशी मी नांदायला' ही मालिका चांगलीच लोकप्रिय झाली होती. मालिकेतील स्वीटू आणि ओमची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
याच लोकप्रिय मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. अगदी अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय झाली होती.
शाल्व किंजवडेकरचे सोशल मीडियावर प्रचंड चाहते आहेत. तो त्याचे फोटोज सोशल मीडियावर सतत शेअर करत असतो.
शाल्वने अनेक वेब सिरीज आणि चित्रपटातून छोट्या मोठ्या भूमिका केल्या आहेत. आता 'येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेनंतर तो कोणत्या नवीन भूमिकेत दिसणार याबद्दल त्याच्या चाहत्यांना उत्सुकता होती.
चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली असून शाल्व आता लवकरच छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तो लवकरच एका नव्या मालिकेत एंट्री घेणार आहे.
त्याची नेमकी भूमिका काय असणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शाल्वला आता नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक आहेत.