advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / कोण होते पंजाबी वादग्रस्त गायक आणि राजकारणी सिद्धू मूसेवाला?

कोण होते पंजाबी वादग्रस्त गायक आणि राजकारणी सिद्धू मूसेवाला?

सिद्धू मूसेवाला यांनी गेल्या वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 29 वर्षीय पंजाबी कलाकाराने मानसा मतदारसंघातून 2022 ची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा आम आदमी पार्टीचे डॉ. विजय सिंगला यांच्याकडून पराभव झाला होता. जाणून घेऊ, या पंजाबी रॅपरबद्दल महत्त्वाच्या गोष्टी.

01
पंजाबमधील मानसा जिल्ह्यात रविवारी झालेल्या गोळीबारात काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लोकप्रिय पंजाबी गायकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. पंजाब सरकारने त्यांच्यासह आणखी 420 हून अधिक लोकांसाठी सुरक्षा काढून घेतल्याच्या एक दिवसानंतर हा भयंकर प्रकार घडला आहे.

02
या लोकप्रिय पंजाबी गायकाचं नाव शुभदीप सिंग सिद्धू आहे, ज्याला सिद्धू मूसेवाला देखील म्हटले जातं. हा कलाकार वादग्रस्त ठरला होता. कारण, त्याच्या काही गाण्यांमध्ये हिंसाचार आणि बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन देण्यात आलं होतं.

03
सिद्धू मूसेवाला हे पंजाबमधील मानसा जिल्ह्यातील मूसा गावचे होते. त्याची आई गावातील प्रमुख आहे. पंजाबमधून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पूर्ण केल्यानंतर, ते 2016 मध्ये स्टडी व्हिसावर कॅनडाला गेले. 2017 मध्ये, त्याने त्याचा पहिला ट्रॅक 'सो हाय' (So High) रिलीज केला.

04
मूसेवालाला त्याच्या गाण्यांबद्दल अनेक खटल्यांचा सामना करावा लागला, ज्यात बंदूक संस्कृती आणि हिंसाचाराला प्रोत्साहन दिले गेले. 2020 मध्ये, कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन पंजाब सरकारने त्याच्या एका गाण्यात बंदूक संस्कृतीला प्रोत्साहन दिल्याबद्दल त्याच्यावर शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

05
कोविड-19 साथीदरम्यान, मूसेवालावर एका व्हायरल व्हिडिओवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यात त्याला फायरिंग रेंजमध्ये AK-47 रायफलने गोळीबार करताना दाखवण्यात आलं होतं. (Photo : Instagram/sidhu_moosewala)

06

मूसेवाला यांनी गेल्या वर्षी पंजाब विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. नवज्योतसिंग सिद्धू, जे पंजाब काँग्रेसचे प्रमुख होते, त्यांनी मूसेवाला यांच्या काँग्रेसमध्ये समावेशादरम्यान त्यांनी त्यांना आताच्या युवा पिढीचं प्रतीक आणि आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व म्हणून संबोधलं होतं. (Photo credit : Twitter/ Navjot Singh Sidhu)

advertisement
07
मूसेवाला यांनी मानसा मतदारसंघातून पंजाबची निवडणूक लढवली होती. आम आदमी पक्षाचे डॉ. विजय सिंगला यांनी त्यांचा 63,323 मतांनी पराभव केला.

  • FIRST PUBLISHED :
  • पंजाबमधील मानसा जिल्ह्यात रविवारी झालेल्या गोळीबारात काँग्रेस नेते आणि पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लोकप्रिय पंजाबी गायकाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. पंजाब सरकारने त्यांच्यासह आणखी 420 हून अधिक लोकांसाठी सुरक्षा काढून घेतल्याच्या एक दिवसानंतर हा भयंकर प्रकार घडला आहे.

    MORE
    GALLERIES