Actress Mahalakshmi: अभिनेत्री महालक्ष्मी आहे तरी कोण? प्रोड्युसरशी लग्न करुन आलीये चर्चेत
बायकॉट बॉलिवूडचा ट्रेंड सुरू असताना मध्येच साऊथ अभिनेत्री महालक्ष्मीनं प्रोड्युसरशी लग्न करून सर्वांचं लक्ष वेधलं आहे. पण कोण आहे की अभिनेत्री? याआधी असं काय केलं आहे तिनं.
तमिळ सिनेअभिनेत्री महालक्ष्मीनं साउथ इंडियन फिल्म प्रोड्यूसर रविंदर चंद्रशेखर बरोबर लग्न केलं. ज्यामुळे ती गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.
2/ 11
महालक्ष्मीनं लग्न केल्यानंतर अचानक संपूर्ण देशाचं आणि सिनेसृष्टीचं लक्ष वेधलं आहे. माणसाच्या दिसण्यावरुन निष्कर्ष काढू नसे असं म्हटलं जातं पण महालक्ष्मीच्या लग्नामुळे या विषयाकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
3/ 11
महालक्ष्मीचा जन्म 21 मार्च 1990 चेन्नईमध्ये आला. महालक्ष्मीचं हे दुसरं लग्न आहे.
4/ 11
महालक्ष्मीनं याआधी 2019मध्ये अनिलबरोबर लग्न केलं होतं. त्यांच नातं फार काळ टिकू शकलं नाही. त्यानंतर 2021मध्ये तिनं एप्रिलमध्ये रविंदरबरोबर रिलेशनमध्ये असल्याची घोषणा केली.
5/ 11
अनेकांनी या लग्नावर सवाल उपस्थित केले होते. रविंदर यांच्या शरिरयष्टीमुळे बॉडी शेमिंग केलं जात आहे. पण महालक्ष्मीनं याआधीच स्पष्ट केलं आहे की तिच्यासाठी प्रेम महत्त्वाचं आहे.
6/ 11
महालक्ष्मीच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं तर टेलिव्हिजन अभिनेत्री होण्याआधी ती व्हिडीओ जॉकी म्हणून काम करायची. सन म्युझक चॅनेलसाठी तिनं व्हिजे म्हणून करिअरला सुरूवात केली.
7/ 11
सिनेमात काम करण्याआधी तिनं अनेक टीव्ही सिरियल्समध्ये काम केलं आहे. वाणी रानी, अरासी आणि यामीरुका या तिच्या गाजलेल्या मालिका आहेत.
8/ 11
महालक्ष्मीनं 2022मध्ये तमिळ सिनेमा मुन्नारीवरमधून डेब्यू केला. नवरा रविंदर चंद्रशेखर सिनेमाचा प्रोड्युसर होता.
9/ 11
महालक्ष्मीची सोशल मीडियावर चांगली फॅन फॉलोविंग आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
10/ 11
2022हे वर्ष अभिनेत्रीसाठी फारचं खास आहे. याच वर्षी तिनं सिनेमात पदार्पण केलंय. तिचं लग्न झाले.
11/ 11
महालक्ष्मी आता कलर्सवरील इधु सोला मारंधा कढाई शोमध्ये दिसणार आहे.