टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिकांमधील एक मालिका म्हणजे बालिका वधु. प्रेक्षकांनी या मालिकेला प्रचंड प्रेम दिलं. एकाच मालिकेत प्रमुख भूमिकेत तीन वेगवेगळ्या अभिनेत्रींची वर्णी लागली.
बालिका वधुमध्ये आनंदी म्हणजेच अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीच्या अचानक मृत्यू नंतर रातोरात तोरल रसपुत्र नव्या आनंदीच्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आली.
अभिनेत्री तोरल रसपुत्रने बालिका वधूमध्ये आनंदी हे पात्र साकारलं. तोरल ही मालिकेतील तिसरी आनंदी होती. तिला देखील प्रेक्षकांचं प्रेम मिळालं.
तोरल रसपुत्र बालिका वधूनंतर बिग बॉस 6, बॉक्स क्रिकेट लीग 2 सारख्या प्रसिद्ध रिअलिटी शोमध्ये दिसली. केसरिया बालम आओ हमारे देस , मधुबाला -एक इश्क एक जूनून, उतरन, रंगरसिया आणि बेइंतेहा सारख्या कलाकृतींमध्ये देखील तिनं काम केलं.
तोरलनं 2006मध्ये बालिका वधू मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळवली. त्यानंतर अनेक टेलिव्हिजन शोमध्ये तिनं काम केलं.
धर्मयोद्धा गरूण या मालिकेत ती शेवटची दिसली. हा शो 2021मध्ये डिसेंबर महिन्यात ऑफ ऐअर झाला. त्यानंतर तोरलनं अभिनयातून ब्रेक घेतला आहे. तिच्याकडे सध्या कोणतंही काम नाहीये.
तोरलने 2012मध्ये बिझनेसमॅन असलेल्या धवलबरोबर लग्न केलं. पण तिचं लग्न केवळ 6 वर्षांत मोडलं. 2018मध्ये धवल आणि तोरलचा घटस्फोट घेतला.
अभिनेत्री सध्या कामातून ब्रेक घेऊन सुट्ट्यांचा आनंद घेतेय. त्याचप्रमाणे ती सोशल मीडियावर सक्रीय असते. अनेक व्हिडीओ आणि फोटो ती शेअर करत असते.