दरवेळी सिनेमा पाहण्यासाठीच थिएटरमध्ये का जायचं मराठी रंगभूमीवर एकाहून एक मराठी नाटकं देखीस सुरू आहेत. तुमचा विकेंडचा काही प्लान झाला नसेल तर तुमच्या जवळच्या नाट्यगृहात सुरू असलेल्या तुमच्या आवडत्या कलाकारांच्या नाटकाचे प्रयोग नक्की पाहा.
दादा एक गुड न्यूज आहे नाटकाचा प्रयोग शनिवारी दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आहे. तर रविवारी 18 सप्टेंबरला संध्याकाळी 4:30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे आहे.
ज्या नाटकाचा समावेश मुंबई विद्यापिठाच्या अभ्यासक्रमात झाला आहे असं संगीत देवबाभळी नाटकाचा 350वा प्रयोग 18 सप्टेंबरला दुपारी 4:30 वाजता दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे आहे.
वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांचं संज्या छाया नाटकाचा प्रयोग रविवारी 18 सप्टेंबरला संध्याकाळी 4 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे आहे.
लीना भागवत मंगेश कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेलं आमने सामने हे नाटक शनिवार 17 सप्टेंबरला रात्री 8:30वाजता दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात आहे. तर रविवारी 18 सप्टेंबरला कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे दुपारी 4:30 वाजता आहे.
तिन पिढ्यांची गोष्ट सांगणारं पत्त्यांचा बंगला हे नाटक रविवारी 18 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे आहे.
नव्यानं रंगभूमीवर आलेलं चारचौघी नाटकाचा प्रयोग शनिवारी 17 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे आहे. तर रविवारी 18 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आहे.
प्रसाद खांडेकर दिग्दर्शित कुर्रर्रर्रर्र नाटकाचा प्रयोग शनिवारी 17 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता विष्णुदार भावे वाशी येथे आहे.
अभिनेता विकास पाटील मुख्य भूमिकेत असलेलं विश्वनायक या नव्या कोऱ्या नाटकाचा प्रयोग शनिवारी 17 ,सप्टेंबर रोजी विष्णुदास भावे नाट्यगृह वाशी येथे रात्री 8:30 वाजता आहे. तर रविवार 18 सप्टेंबरला रात्री 8:30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे आहे.
खरं खरं सांगा या नाटकाचा प्रयोग शनिवारी 17 सप्टेंबरला रात्री 8:30 वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह डोंबिवली येथे आहे. तर रविवारी 18 सप्टेंबरला दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवली येथे आहे.
अभिनेता संतोष पवार, अभिजीत केळकर मुख्य भूमिकेत असलेला हौस माझी पुरी करा या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग रविवारी 18 सप्टेंबर रोजी दुपारी 4:30 वाजता आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण येथे होणार आहे.