दिवाळीला सुरूवात झाली आहे. दिवाळीतर प्रकाशमय करायची आहे पण सोबत मनोरंजनाची मेजवानीही हवीच. जवळच्या नाट्यगृहात कोणत्या नाटकांचे प्रयोग रंगणार आहेत जाणून घ्या.
वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांचं संज्या छाया नाटकाचा प्रयोग शनिवारी 22 ऑक्टोबरला दुारी 4वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे होणार आहे. त्याचप्रमाणे रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे.
अशोक सराफ आणि निर्मिती सावंत यांचं व्हॅक्युम क्लिनर या नाटकाचा प्रयोग शनिवारी 25 ऑक्टोबरला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे. संपूर्ण आठवड्यात नाटकाचे 4 प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळतील.
विश्वविक्रमी नाटक अलबत्या गलबत्याचा दिवाळी स्पेशल शो संपूर्ण आठवडाभर आहे. शनिवारी 22 ऑक्टोबरला संध्याकाळी 7.30 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे. तर रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता आचार्य अत्रे कल्याण येथे होणार आहे. त्यानंतरही आठवडाभर मुंबईजवळील नाट्यगृहात नाटक सुरू राहणार आहे.
माय फ्रेंड गोरीला या बालनाट्याचा प्रयोग रविवारी 23 ऑक्टोबरला सकाळी 11.30 वाजता दीनानाख नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे. तर सध्याकाळी 5 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे.
दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाचा प्रयोग 22 ऑक्टोबरला दुपारी 4.15वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे. त्यानंतर रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4.3 वाजता कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे होणार आहे.
खरं खरं सांग हे नाटक रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4.30 सावित्रीबाई फुले डोंबिवली येथे पाहायला मिळणार आहे.
नव्यानं रंगमंचावर आलेलं चारचौघी नाटकाचा प्रयोग 22 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे आहे. तर रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे आहे.
प्रशांत दामले, वर्षा उसगांवकर यांच्या सारखं काहीतरी होतंय या नाटकाचा शंभरावा प्रयोग रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे होणार आहे.
38 कृष्ण व्हिला नाटकाचा प्रयोग 22 ऑक्टोबरला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे तर रविवारी 23 ऑक्टोबरला दुपारी 4.15 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे.