प्रशांत दामले आणि कविता मेंढेकर यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट नाटकाचा 525वा प्रयोग रंगणार आहे. या विकेंडला आणखी कोणत्या नाटकांचे प्रयोग मुंबईत रंगणार आहेत तेही पाहा.
कुर्रर्रर्रर्र या धम्माल विनोदी नाटकाचा प्रयोग 30 ऑक्टोबर रविवारी संध्याकाळी 4.30 वाजता आचार्य अत्रे कल्याणला आहे.
अंशुमन विचारे प्रमुख भूमिकेत असलेल्या वाकडी तिकडी नाटकाचा प्रयोग 30 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आहे.
माय फ्रेंड गोरिला हे बालनाट्य शनिवारी 29 ऑक्टोबरला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे रंगणार आहे.
38 कृष्ण व्हिला नाटकाचा प्रयोग 29 ऑक्टोबरला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे तर रविवारी 30 ऑक्टोबरला दुपारी 4.15 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे.
सर्वाधिक पाहिलं जाणारं दादा एक गुड न्यूज आहेचा प्रयोग शनिवारी रात्री 8.30वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे आहे. तसंच रविवारी 30 ऑक्टोबरला दुपारी 4.30 वाजता सावित्रीबाई फुले डोंबिवली येथे आहे.
मी स्वरा आणि ते दोघं चा प्रयोग 30 ऑक्टोबरला रविवारी 4.30 वाजता क्रां. वासुदेव फडके पनवेलला होणार आहे.
हीच तर फॉमिलीची गंमत आहे या धमाकेदार विनोदी नाटकाचा प्रयोग 29 ऑक्टोबरला रात्री 8.30 वाजता क्रां. वासुदेव फडके पनवेल येथे होणार आहे.
अलबत्या गलबत्या नाटकाचा प्रयोग 29 ऑक्टोबरला रात्री 8.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे तर रविवारी 30 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे होणार आहे.
अशोक मामा, निर्मीती सावंत यांची तुफान कॉमेडी व्हॅक्युम क्लीनरचा प्रयोग शनिवारी 29 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे होणार आहे. तर रविवारी 30 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे.
अमृता सुभाष संदेश कुलकर्णी यांचं पुनश्च हनिमून नाटकाचा प्रयोग शनिवारी 28 ऑक्टोबरला संध्याकाळी 7.30 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आहे.
हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकाचा प्रयोग शनिवारी 29 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे आहे.
नव्यानं रंगमंचावर आलेलं चारचौघी नाटकाचा प्रयोग 29 ऑक्टोबरला दुपारी 3.45 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे.
एका लग्नाची पुढची गोष्ट या धमाकेदार नाटकाचा 525वा प्रयोग 30 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे होणार आहे. तर शनिवारी नाटकाचे दोन प्रयोग दुपारी 4 वाजता आचार्य अत्रे कल्याण तर रात्री 8.30 वाजता सावित्रीबाई फुले डोबिंवली येथे होणार आहे.