अलबत्या गलबत्या या बालनाट्याचा प्रयोग रविवारी 6 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे आहे. तर त्याच दिवशी संध्याकाळी 4.30 वाजता रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे होणार आहे.
38 कृष्ण व्हिला नाटकाचा प्रयोग 05 नोव्हेंबरला दुपारी 4.15 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे. तर 6 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता वासुदेव फडके पनवेल येथे होणार आहे.
नाट्यसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध असं दादा एक गुड न्यूज नाटकाचा प्रयोग शनिवारी 05 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे. त्याचप्रमाणे रविवार 6 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे होणार आहे.
अभिनेते प्रशांत दामले यांचा वैयक्तिक विक्रमी प्रयोग 12,500 वा प्रयोग असलेलं एका लग्नाची पुढची गोष्ट हे नाटक रविवारी 6 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता श्री षण्मुखानंद थिएटर किंग्ज सर्कलला होणार आहे. तसंच 05 नोव्हेंबरला रात्री 8.30 वाजता दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले येथे होणार आहे.
माय फ्रेंड गोरीला या बालनाट्याचा प्रयोग रविवार 6 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर ठाणे येथे होणार आहे.
खरं खरं सांग या नाटकाचा प्रयोग शनिवारी 4 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे होणार आहे. तर रविवारी 6 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे.
चारचौघी नाटकाचा प्रयोग 05 नोव्हेंबरला रात्री 8.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे आहे. तर 6 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता सावित्राबाई फुले डोंबिवली येथे होणार आहे.
प्रिया मराठे, पुष्कर श्रोत्री, प्रमुख भूमिके असलेलं अ परफेक्ट मर्डर या नव्या नाटकाचा प्रयोग 6 नोव्हेंबरला दुपारी 3.30 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे.