दोन नवी कोरी नाटकं रंगभूमीवर आली आहेत. या विकेंडला दोन नाटकांना एव्हरग्रीन मोरूची मावशी नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
माय फ्रेंड गोरिला या बालनाट्याचा प्रयोग शनिवारी 26 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे.
आस्ताद आणि अदिती यांचं चर्चा तर होणार नाटकाचा प्रयोग 26 नोव्हेंबर शनिवारी 4.30 वाजता सावित्रीबाई फुले डोंबिवली येथे होणार आहे. तर 27 नोव्हेंबर रविवारी रात्री 8 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे होणार आहे.
अलबत्या गलबत्याचा प्रयोग 27 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता शिवाजी मंदिर दादर येथे आहे तर रात्री 8 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे होणार आहे.
वैभव मांगले आणि निर्मिती सावंत यांच्या संज्या छायाचा प्रयोग 26 नोव्हेंबर शनिवारी दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे. तर शंभरावा प्रयोग 27 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता दीनानाथ पार्ले येथे होणार आहे.
चंद्रकांत कुलकर्णी यांचं चारचौघी हे नाटक 27 नोव्हेंबरला दुपारी4 वाजता रवीद्र नाट्यमंदिर प्रभादेवी येथे होणार आहे.
दादा एक गुड न्यूज आहेचा प्रयोग 26 नोव्हेंबर शनिवारी रात्री 8.30 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे होणार आहे. तर रविवारी 27 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता आचार्य अत्रे कल्याण येथे होणार आहे.
आमने सामने नाटकाचा प्रयोग 26 नोव्हेंबरला रात्री 8.3 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे आहे तर 27 नोव्हेंबर रविवारी दुपारी 4.30 वाजता सावित्रीबाई फुले डोंबिवली येथे होणार आहे.
प्रशांत दामले वर्षा उसगांवकर यांचं सारखं काहीतरी होतंयचा प्रयोग 26 नोव्हेंबर शनिवारी दुपारी 4 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे आहे आणि रात्री 4.30 वाजता क्रां. वासुदेव फडके पनवेल येथे होणार आहे.
संगीत देवबाभळी तुम्हाला 26 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता दीनानाथ नाट्यगृह पार्ले येथे पाहायला मिळेल. तसंच 27 नोव्हेंबरला दुपारी 4.30 वाजता विष्णुदास भावे वाशी येथे पाहायला मिळेल.
एव्हरग्रीन मोरूची मावशी नाटक 26 नोव्हेंबरला दुपारी 4.3 वाजता दमोदर हॉल परळला होणार आहे. त्यानंतर 27 नोव्हेंबर दुपारी 4.30 वाजता गडकरी रंगायतन ठाणे येथे होणार आहे.
तिन पिढ्यांची गोष्ट सांगणारा हरवलेल्या पत्त्यांचा बंगला या नाटकाचा प्रयोग शनिवारी 4 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजता प्रबोधनकार ठाकरे बोरिवली येथे रंगणार आहे. तर 27 नोव्हेंबरला दुपारी 4.30 कालिदास नाट्यमंदिर मुलुंड येथे रंगणार आहे.
अ परफेक्ट मर्डर हे नाटक तुम्हाला 26 नोव्हेंबर शनिवारी रात्री 8.3 वाजता डॉ. काशिनाथ घाणेकर ठाणे येथे पाहायला मिळेल.
38 कृष्ण व्हिला या नाटकाचा प्रयोग 26 नोव्हेंबरला रात्री 8.30 वाजता सावित्री बाई फुले डोंबिवली येथे होणार आहे.