मराठी बातम्या » फोटोगॅलरी » मनोरंजन » Anushka Sharma and Virat Kohli : हातात वाफाळलेल्या कॉफीचा कप आणि चेहऱ्यावर दिलखुलास हास्य; अनुष्का विराटचा यूकेच्या रस्त्यावर रोमान्स
Anushka Sharma and Virat Kohli : हातात वाफाळलेल्या कॉफीचा कप आणि चेहऱ्यावर दिलखुलास हास्य; अनुष्का विराटचा यूकेच्या रस्त्यावर रोमान्स
आशिया कपनंतर विराट कोहली आपल्या कुटुंबासोबत मस्त एन्जॉय करत आहे. तसे, विराट आणि अनुष्का त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलणे टाळतात. पण अनेकदा ते सोशल मीडियावर काही फोटो शेअर करतात जे चाहत्यांची मनं जिंकतात. यावेळी देखील अनुष्का शर्माने पती आणि क्रिकेटर विराट कोहलीसोबतचे यूकेमधील काही फोटो शेअर केले आहेत.
आशिया कपनंतर विराट कोहली आपल्या कुटुंबासोबत मस्त एन्जॉय करत आहे. अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2/ 9
या फोटोंमध्ये विराट रस्त्याच्या कडेला असलेल्या कॅफेमध्ये अनुष्कासोबत रोमँटिक कॉफी डेटचा आनंद घेताना दिसला.
3/ 9
या फोटोंमध्ये अनुष्का शर्माने गुलाबी रंगाचे लोअर असलेले काळ्या रंगाचे हुडी जॅकेट घातले आहे.तर विराट कोहलीने तपकिरी रंगाचे जॅकेट घातले आहे. फोटोमध्ये दोघांनी हातात कॉफीचे मग घेतले आहेत आणि एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.
4/ 9
या रोमँटिक रोडसाइड कॅफेमध्ये अशा कॉफी डेटचा आनंद घेत असलेले विराट आणि अनुष्काला पाहून त्यांच्या चाहत्यांनाही खूप आनंद झाला आहे.
5/ 9
अनुष्का आणि विराटने एक सेल्फीही क्लिक केला आहे. या सेल्फीमध्ये हे दोन्ही कपल एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत. ही सर्व छायाचित्रे अनुष्का शर्माने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर हार्ट आयकॉनसह शेअर केली आहेत.
6/ 9
अनुष्का शर्मा सध्या यूकेमध्ये तिच्या आगामी 'चकडा एक्सप्रेस' चित्रपटाचे शूटिंग करत आहे.
7/ 9
शूटिंगदरम्यान अनुष्काने वेळ काढला आणि विराट कोहलीसोबत या रोमँटिक कॉफी डेटवर गेली.
8/ 9
विराट अनुष्काची केमिस्ट्री चाहत्यांना नेहमीच आवडते. हे दोघे बऱ्याचदा एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.
9/ 9
आशिया कपमध्ये नुकतंच विराटने बऱ्याच दिवसानंतर शतक ठोकले होते. त्यावेळी अनुष्काने त्याच्यासाठी केलेली इंस्टाग्राम पोस्ट देखील चर्चेचा विषय ठरली होती.