बॉलिवूडचा कमांडो अशी ओळख असणारा अभिनेता म्हणजे विद्युत जामवाल. त्याचा प्रत्येक चित्रपट ऍक्शन आणि धोकादायक स्टंटने भरलेला असतो.
कुठून उडी मारणं असो कि काही तोडफोड असो विद्युत जामवाल त्याच्या चित्रपटांमध्ये सगळे धोकादायक स्टंट स्वत: शूट करतो.
बॉलीवूडचा सर्वात पॉवरफुल ऍक्शन हिरो विद्युत जामवाल याने अलीकडेच हिमालयातील त्याच्या ट्रेनिंगचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
फोटोंमध्ये विद्युत बर्फात बुडून मार्शल आर्ट्सचा सराव आणि अॅक्शन करताना दिसत आहे. कोणतेही कपडे न घालता त्याने अनेक तास स्वत:ला बर्फाच्या आत ठेवले.
विद्युतने हे फोटो इंस्टाग्रामवर मजेशीर कॅप्शनसह शेअर केले आहेत. त्याने लिहिलं- माझा मार्ग वेगळा आहे, तुमची पार्टी करण्यापेक्षा मला इथे चिल करायला जास्त आवडत.
विद्युतचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्याचे धाडस आणि जोश पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटत आहे. हिमालयाच्या या शून्य अंश तापमानात त्याला बर्फात पडलेले पाहून बहुतेकांना धक्का बसला.
विद्युत हा मार्शल आर्टिस्ट आहे आणि केरळच्या कलारीपट्टू मार्शल आर्ट्समध्ये तज्ञ आहे. विद्युतने आतापर्यंत २५ हून अधिक देशांमध्ये या कलेचे अनेक लाइव्ह अॅक्शन शो केले आहेत.
याआधीही विद्युतने सोशल मीडियावर आपल्या खतरनाक ट्रेनिंग आणि स्टंट्सने चाहत्यांना चकित केले आहे. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांमध्ये दमदार स्टंट करताना दिसतो. इतकंच नाही तर चित्रपटांमधील अत्यंत धोकादायक स्टंटसाठीही विद्युत कधीही बॉडी डबल वापरत नाही. त्याचे सर्व अॅक्शन सीन तो स्वतः शूट करतो.
विद्युत जामवालने वयाच्या 3 व्या वर्षी मार्शल आर्ट शिकण्यास सुरुवात केली. विद्युतने आंतरराष्ट्रीय स्तरावर मार्शल आर्टचे उच्च शिक्षण घेतले आहे. त्याच्या फिटनेस आणि मस्क्युलर बॉडीमुळे त्याचा देश-विदेशात मोठा चाहतावर्ग आहे.