Vedat Marathe Veer Daudale Sat : अक्षय कुमार महाराजांच्या भूमिकेत; कोण आहेत ते सात मावळे? पाहा
महेश मांजरेकर दिग्दर्शित वेडात मराठे वीर दौडले सात या नव्या सिनेमाची घोषणा करण्यात आली. अभिनेता अक्षय कुमार सिनेमात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. तर सिनेमातील इतर सात कलाकार कोण आहेत जाणून घ्या.
वेडात मराठे वीर दौडले सात या नव्या मराठी सिनेमाची नुकतीच घोषणा करण्यात आली. महेश मांजरेकरांचा हा आतापर्यंतचा बिग बजेट सिनेमा आहे.
2/ 9
छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या सात वाघांची गोष्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्या सात वीरांचा पहिला लुक समोर आला आहे. कोण आहेत कलाकार आणि कोणती भूमिका साकारणार पाहूयात.
3/ 9
बिग बॉस मराठी 3चा विजेता अभिनेता विशाल निकम चंद्राजी कोठार यांची भूमिका साकारणार आहे. बिग बॉस नंतर विशालला मिळालेला सर्वात मोठा ब्रेक आहे.
4/ 9
नुकत्यात आलेल्या हर हर महादेव या सिनेमात आबाजी विश्वनाथ साकारल्यानंतर अभिनेता हार्दीक जोशी वेडात मराठे वीर दौडले सात सिनेमात मल्हारी लोखंडे साकारणार आहे.
5/ 9
सरसेनापती हंबीरराव मोहिते नंतर अभिनेता प्रविण तरडे प्रतापराव गुजर यांच्या दमदार भूमिकेत दिसणार आहेत.
6/ 9
तर अभिनेता विराट मडके हा जिवाजी पाटील ही भूमिका साकारणार आहे.
7/ 9
महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर सिनेमात दत्ताजी पागे यांच्या भूमिकेत दिसणार आहे.
8/ 9
बिग बॉस मराठी 3मधील अभिनेता आणि गायक उत्कर्ष शिंदे या सिनेमातून पदार्पण करतोय. सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत उत्कर्ष शिंदे दिसणार आहे.
9/ 9
बिग बॉस मराठी 3मधला तिसरा स्पर्धक जय दुधाणे देखील सिनेमात असून तुळजा जामकर यांची भूमिकेत दिसणार आहे.