उर्फीने नुकतंच ह्युमन्स ऑफ बॉम्बे' ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या घर आणि कुटुंबाइयांविषयी धक्कादायक खुलासा केला आहे.
उर्फीने नुकतंच सांगितलं कि, तिच्या वडिलांनी तिच्याशी कसे गैरवर्तन केले आणि यामुळे तिने लहान वयातच घर सोडण्याचा निर्णय घेतला.
उर्फी जावेदने खुलासा केला की वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी तिचा फोटो कोणीतरी पॉर्न साइटवर अपलोड केला होता. यादरम्यान तिच्या वडिलांनी तिला साथ देण्याऐवजी तिच्यावर आरोप केले.
उर्फीचे वडील तिला तिच्या आई आणि बहिणींना मारहाण करायचे. एवढंच नाही तर तिचे वडील स्वत: आपल्या मुलीला पॉर्नस्टार म्हणायचे. यासोबतच त्यांनी तिच्याबद्दलच्या खोट्या गोष्टी नातेवाईकांपर्यंत पोहोचवल्या.
अभिनेत्री पुढे म्हणाली, 'माझ्या वडिलांनी मला कधीच समजून घेतले नाही. उलट तो लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असे. मी बेशुद्ध होईपर्यंत ते मला मारहाण करायचे. त्याच्या या सगळ्या गोष्टींमुळे मी आत्महत्येचा विचारही करू लागले.' असंही तिने म्हटलं आहे.
उर्फी जावेदने सांगितले की, 'मला लहानपणापासून फॅशनची आवड होती. मी लखनौमध्ये क्रॉप टॉपवर जॅकेट घालत असे जेथे मुलींना असे कपडे घालण्याची परवानगी नव्हती. पप्पा शिव्या देत होते, यासाठी ते मला खूप मारायचे. मग एके दिवशी त्यांच्या छळाला कंटाळून मी वयाच्या १७ व्या वर्षी पैसे नसताना घरातून पळून गेले.'
'इथे मी ट्यूशन घ्यायला सुरुवात केली आणि कॉल सेंटरमध्ये कामही केलं. मी मुंबईत येऊन डेली सोपमध्ये छोट्या भूमिका केल्या. त्यानंतर मला बिग बॉसमध्ये येण्याची संधी मिळाली आणि इथूनच मला ओळख मिळाली.' असं उर्फीने सांगितलं आहे.