सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या अतरंगी फॅशनमुळे चर्चेत राहते. तिच्या खाजगी आयुष्याविषयी फार कमी लोकांना माहित आहे.
उर्फी जावेदने यावेळी तिच्या बालपणीचा काळ खूप कठीण होता. तिने आतापर्यंत दोन वेळा जीव देण्याचा देखील प्रयत्न केला आहे.
उर्फी जावेद लखनऊची असून ती एका कट्टर मुस्लिम कुटुंबात वाढली. त्यामुळे तिच्यावर बालपणापासून अनेक बंधनं होती.
वडिलांबद्दल सांगताना उर्फी म्हणाली कि, 'ते रोजच आई आणि आम्हा भावंडांवर अत्याचार करायचे,रोज आम्हाला मारहाण आणि शिवीगाळ करायचे.'
ती पुढे म्हणाली 'जर कोणी तुम्हाला घरात दररोज शिव्या देत असेल, मारहाण करत असेल तर तुम्हाला कसे वाटेल? त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेले होते. त्यामुळेच मी एक-दोनदा आत्महत्येचा प्रयत्नही केला.' असा खुलासा उर्फीने केला आहे.
उर्फीने वडिलांचा तिच्या अभिनेत्री होण्याला विरोध होता असे सांगितले आहे. यावेळी बोलताना ती म्हणाली, ' मला फॅशनमध्ये नेहमीच रस होता. मला फॅशनबद्दल फारशी माहिती नव्हती पण काय घालायचे हे मला माहीत होते. मला वेगळे व्हायचे होते, मला माझे सर्वोत्तम दिसायचे होते.'