एकेकाळी या अभिनेत्री टीव्हीवरच्या क्वीन होत्या, पण आता त्यांना काम मिळतनाही अशी अवस्था झाली आहे.सध्या त्या घरी रिकाम्या बसल्या आहेत. अशा परिस्थितीत घर चालवण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी त्यांनी एक चांगला पर्याय निवडला आहे. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)
देबिना बॅनर्जीनं रामायणातील सीतेची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली. मात्र गेल्या तीन- चार वर्षांपासून ती टीव्हीच्या दुनियेतून गायब आहे. मात्र ती प्रसिद्धीच्या झोतात राहते. त्याचे कारण म्हणजे तिच्या दोन मुली - लियाना आणि दिविशा आणि तिचा व्लॉग देबिना डीकोड्स. YouTube वरून कमाई करण्याव्यतिरिक्त, ती तिच्या व्लॉगद्वारे फॅशन आणि किड ब्रँड्सचे पेड प्रमोशन करताना दिसते. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)
रती पांडेने 'हिटलर दीदी' द्वारे लोकप्रियता मिळवली. तिनं 'शादी मुबारक', 'देवी आदि पराशक्ती' सारख्या टीव्ही शोमध्ये काम केले. मात्र गेल्या 3 वर्षांपासून तिच्याकडे काम नाही. तेव्हापासून रती पांडे डायरीज नावाचा व्लॉग सुरू केला आणि हे कमाईचे माध्यम बनवले. प्रवासाचे आणि वैयक्तिक आयुष्यातील अनुभव ती शेअर करते. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)
दीपिका ककरने नुकतेच बाळाला जन्म दिला आहे. ती बऱ्याच दिवसांपासून टीव्हीवर काम करत नाहीये. पण प्रसिद्धीच्या झोतात असते. ती 'दीपिका की दुनिया' नावाचा व्लॉग चालवते. तिचा नवरा शोएब इब्राहिम आणि वहिनी यांनी देखील व्लॉगिंगच्या जगात पाऊल ठेवले आहे. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)
मोहना कुमारी सिंहने 'डान्स इंडिया डान्स सीझन 3', कुबुल है, गुमराह: एंड ऑफ इनोसेन्स यांसारख्या अनेक टीव्ही शोमध्ये काम केले. 2019 मध्ये ती खत्रा खत्रा खत्रा या चित्रपटात दिसली होती. यानंतर ती टीव्हीच्या जगापासून दूर आहे. ती रेवाची राजकन्या आहे. ती मोहेना व्लॉग्स नावाचे यूट्यूब चॅनल चालवते. ती गेल्या 1 वर्षापासून सक्रिय नाही. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)
'अगले जनम मोहे बिटिया ही कीजे', 'संतोषी मां', 'राधा की बेटियों कुछ कर दिखेंगे' यांसारख्या टीव्ही शोमध्ये काम केलेल्या रतन राजपूतने खूप लोकप्रियता मिळवली. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्याला कोणतीही ऑफर मिळत नाहीये. ती फक्त व्लॉगिंगच्या दुनियेत हात आजमावत आहे. यूट्यूब जाहिरातीद्वारे लाखोंची कमाई करते. (छायाचित्र सौजन्यः इंस्टाग्राम)
संभावना सेठ ही भोजपुरीची टॉप अभिनेत्री आहे. तिनं अनेक चित्रपटांमध्येही काम केले आहे. बिग बॉसच्या दुसऱ्या सीझनमध्येही ती स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. संभावना तिचे रुटीन लाईफ तिच्या चाहत्यांसोबत व्लॉगिंगद्वारे शेअर करते. (फोटो क्रेडिट्स: इंस्टाग्राम