पिंक साडी विथ साऊथ इंडियन दागिन्यांमध्ये अमृता फारचं सुंदर दिसली. त्याचप्रमाणे तिनं साडीला थोडासा इंडोवेस्टर्न लुक देण्याचा प्रयत्न केला होता.
पिवळी साडी त्याला निळी काठ आणि निळ ब्लाऊज. माथी मुंडावळ्या, नाकात साजीशी नथ, फुलांच्या माळा आणि नातेवाईक मित्रमंडळींच्या उपस्थितीत अमृता आणि नीलच्या डोक्यावर लग्नाच्या अक्षता पडल्या.
दोघांचे लग्नातील खास फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून अमृताच्या चाहत्यांनी तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत भरभरुन शुभेच्छा दिल्यात.
अमृताच्या लग्नाला तिच्या मालिकेतील आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आणि मित्र मैत्रिणींनी हजेरी लावली होती.