बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर सध्या सतत चर्चेत असतो. तो त्याचा आगामी चित्रपट 'तू झुठी में मक्कार'च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
रणबीर कपूर सोशल मीडियापासून अंतर बाळगून आहे. त्याच्या चाहत्यांना अनेक वेळा तो सोशल मीडियावर का नाही असा प्रश्न पडतो.
रणबीरला सोशल मीडियावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. आता अखेर अभिनेत्याने त्याविषयी खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत रणबीरला याविषयी विचारलं असता त्याने सांगितले की, 'एखादा कलाकार सोशल मीडियावर आला की, त्याला स्वत:ला एका विशिष्ट पद्धतीने राहावे करावे लागते, नेटिझन्सच्या कायम संपर्कात राहावं लागतं.
तो याविषयीच बोलताना पुढे म्हणाला कि, 'सोशल मीडियावर असल्यावर तुम्हाला लोकांचं मनोरंजन करावे लागते आणि माझ्यात ती गोष्ट नाही.'
तो पुढे म्हणाला, 'मला असं वाटतं आम्ही जाहिराती करतो, मार्केटिंग करतो, चित्रपट करतो कुठे ना कुठेतर लोक आम्हाला बघून कंटाळा असतील आणि ते म्हणत असतील आणखीन काहीतरी वेगळे बघुयात.' अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.
रणबीर कपूरनेसोशल मीडियापासून दूर राहण्याचा फायदाही यावेळी सांगितला. तो म्हणाला की सोशल मीडियापासून दूर असल्याने मी माझ्या प्रायव्हसीचे रक्षण करतो, जेणेकरून जेव्हाही माझा चित्रपट येतो तेव्हा लोक फक्त मला पाहण्यासाठी येतील.'
रणबीर-श्रद्धाचा 'तू झुठी मै मक्कार' हा चित्रपट 08 मार्च 2023 म्हणजेच होळीच्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.