टाइमपास सिनेमातील सर्वांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब सोशल मीडियावर सक्रीय असतो. दिवाळीत प्रथमेशनं केलेल्या फोटोशूटमुळे तो चांगलाच चर्चेत आला होता. दगडूला रिअल लाईफ गर्लफ्रेंड भेटली या चर्चांनी चांगलाच जोर धरला आहे. प्रथमेशनं काही या प्रश्नावर उत्तर दिलेलं नाही. इतरांची दिवाळी संपली प्रथमेशच्या गर्लफ्रेंडच्या चर्चा देखील निवळल्या आहेत. मात्र दादूसची दिवाळी काही संपत नाहीये. चकल्या कंरज्या हातात घेऊन प्रथमेश दिवाळी काही संपत नाहीये असं म्हणतोय. प्रथमेशनं पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, 'जोपर्यंत दिवाळीचा फराळ संपत नाही तोपर्यंत दिवाळी पंसत नाही'. प्रथमेशनं दिवाळीच्या फराळांबरोबर केलेलं क्रिएटिव्ह फोटोशूट सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत.