ठिपक्यांची रांगोळी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर सोशल मीडियावर सक्रीय असते.
तिचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर ती शेअर करत असते. तिच्या लेटेस्ट पोस्टवर काही ट्रोलर्सच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
ज्ञानदाच्या वजनावरून तिला ट्रोल करण्यात आलंय. मात्र तिने यावर कोणतीही प्रतिक्रिया आजवर दिली नव्हती.
कोणीतरी मला 'कसाटा आईस्क्रीम' आहे असं म्हटले आहे आणि ते खूप योग्य आहे! जस्ट चिलीन, असं कॅप्शन देत ज्ञानदाने फोटो शेअर केलेत. या फोटोवर एका ट्रोलरनं, "कापड कमी पडलं वाटतं", अशी कमेंट केली आहे.
ट्रोलरच्या कमेंटवर, "कपडे नाही तुमच्या विचारांची पोच कमी पडली", असा रिप्लाय देत चांगलीच चपराक लगावली आहे.