या फोटोमध्ये दिसणाऱ्या या मुलाला नीट पाहिलं तर साऊथ सिनेसृष्टीतील सुपरस्टारची झलक तुम्हाला पाहायला मिळेल. हा मुलगा साऊथ इंडस्ट्रीत मास्टर फिल्म्स करून आपलं नाव कमावतोय.
फोटोमधील हा मुलगा आहे थालापति विजय. अभिनेत्याचा जन्म 22 जून 1974 मध्ये चेन्नईमध्ये झाला. विजय आज त्याचा 49वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचं खर नाव जोसेफ विजय चंद्रशेखर असं आहे.
विजयचे वडील दिग्दर्शक आणि आणि आई गायिका होती. त्याला विद्या म्हणून एक बहिण होती पण बहिणीचं निधन झालं. वडील दिग्दर्शक असले तरी सिनेमात काम करून इंडस्ट्रीमध्ये आपलं कमावणं विजयसाठी सोपं नव्हतं.
विजयनं वयाच्या 10व्या वर्षी बालकलाकार म्हणून काम करण्यास सुरूवात केली. पहिल्या कामाचे त्याला 500 रुपये मानधन मिळालं होतं. 1992मध्ये आलेल्या Naalaiya Theerpu सिनेमातून त्याने प्रमुख अभिनेता म्हणून काम करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्याचं वय 18 वर्ष होतं.
विजयने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, माझा पहिला सिनेमा रिलीज झाला तेव्हा त्याला चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर एका मॅगझीनमध्ये माझा फोटो आला होता त्या फोटोची खूप चर्चा झाली आणि रातोरात मला काम मिळू लागली.
आता विजयला ओळखीची गरज नाहीये. आतापर्यंतच्या करिअरमध्ये विजयने 66 सिनेमात काम केलंय. लियो हा त्याचा 67वा सिनेमा आहे जो 19 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. विजयला त्याच्या फॅन्सनी थालापति असं नाव दिलं आहे. ज्याचा अर्थ कमांडर असा होतो. मिळालेल्या माहितीनुसार, विजय हा 445 कोटींची मालक आहे.