दिवाळी झाली असली तरी तिने आता आता दिवाळीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. पण हे फोटो टाकायला उशीर का झाला याचं भन्नाट कारण देखील तिने सांगितलं आहे.
खरंतर तेजस्विनीला जास्त फोटो पोस्ट करायला आवडत नाही असं तिने म्हंटलंय. याबद्दल सांगताना तिने लिहिलंय कि, ''फोटो खूप कमी काढते मी...आणि पोस्ट तर त्याहून कमी करते ( माझ्या वेगवेगळ्या ड्रेसेस वरुन अंदाज बांधा)''
आता याच कारणावरून तेजस्विनीने बहिणीचा ओरडा खाल्ला. ती म्हणते, ''आत्ता मोठी बहीण ओरडली "नुसती फोन मेमोरी वाढवते, फोटो टाकत तर नाहीस आणि वेळच्या वेळी तर त्याहून नाही"
तिने पुढे लिहिलंय कि, ''दिवाळी तुळशीच्या लग्नापर्यंत साजरी केली जाते ना मित्र-मैत्रिणींनो ? मग घाई काय आहे मी म्हणतेय''
''माझी अजून जवळची काही टाळकी आहेत, त्यांना मी खूप मिस केलं. पण हे काही आनंदाचे क्षण तुमच्याबरोबर शेअर करतेय. नवीन वर्षाच्या शुभेच्छा''
तेजस्विनीने मोठ्या बहिणीचं ऐकून जरी हे फोटो पोस्ट केले असले तरी ''बहिणीला अजिबात घाबरत नाही मी'' असंही ती म्हणतेय.
लेट का होईना पण तेजस्विनीने जवळच्या व्यक्तींसोबत फोटो पोस्ट करत चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. चाहत्यांनी देखील कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.