टीव्ही जगतातील सगळ्यांचं आवडतं कपल तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा म्हणजेच 'तेजरन' हे सध्या त्यांच्या नात्यामुळे खूप चर्चेत आहे.
करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची प्रेमकहाणी 'बिग बॉस 15' दरम्यान सुरू झाली होती. या शोमधील दोघांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. यासोबतच दोघेही अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र येताना दिसले आहेत.
दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं होतं. पण मध्येच करणने केलेल्या एका ट्विटमुळं दोघांच्या नात्यात दुरावा आला असल्याची चर्चा सुरु झाली.
या ट्विटमध्ये करणने लिहिले होते की, 'तू जे खूप ऍटिट्यूड मध्ये सांगितलंस तेच जर हसून सांगितलं असतंस तर त्यामुळे तुझा मान कमी झाला नसता.' त्याचं हे ट्विट तेजस्वी साठीच असल्याची चर्चा सुरु झाली.
तेजस्वी प्रकाशने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत करणसोबतच्या ब्रेकअपच्या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत.
याबाबत तेजस्वी म्हणते की, ती करणच्या प्रेमात आहे आणि त्याचे आणि करणचे नाते दिवसेंदिवस अधिक घट्ट होत आहे. यासोबतच त्याने करणसोबतच्या लग्नाबाबतही संकेत दिले आहेत.
अभिनेत्री म्हणाली, 'मी प्रेमात आहे आणि मी थोडी श्रद्धाळु देखील आहे. मला वाटते की मी माझ्या नात्याबद्दल जितके जास्त बोलेन तितके लोक त्याकडे लक्ष देतील. माझ्या आयुष्यात लग्न करणं खूप महत्त्वाचं आहे. पण ते प्रत्यक्षात येईपर्यंत मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. त्यामुळे या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चाना पूर्णविराम लागला आहे.