अभिनेत्री श्रेया सरन साउथ सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. श्रेयाच्या सिजलिंग फिगर, हॉट कर्व्स आणि टाइट स्किनच्या मागे अंडी, मासे किंवा चिकन नाही तर शुद्ध शाकाहारी जेवण आहे. श्रेया घरी केलेलं जेवणं खाणं नेहमी पसंत करते.
अभिनेत्री तृषा कृष्णनही शाकाहारी असून ती नैसर्गिक अन्न खाण्यास प्राधान्य देते. उत्तपम आणि सांभार तिचं आवडतं जेवण आहे. जनावरांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आपण एकत्र आलं पाहिजे असं ती म्हणते.
अभिनेता आर माधवन देखील शुद्ध शाकाहारी आहे. त्याचं किचन हे त्याच्या गार्डन एरियामध्ये आहे. भाज्या तो स्वत: त्याच्या गार्डनमध्ये पिकवतो. तो पेटा या संस्थेची संलग्न आहे.
जय भीम फेम अभिनेता सूर्या देखील शाकाहारी असून डाएट फूट तो स्ट्रिकली फॉलो करतो. दही भात त्याचा आवडता पदार्थ आहे.
एमी जॅक्शन ही अभिनेत्री देखील शुद्धा शाकाहारी सेलेब्सच्या लिस्टमध्ये आहे. आधी ती नॉनव्हेज खात होती पण प्रेग्नंसीच्या काळात तिनं नॉनव्हेज सोडलं.
बाहुबली फेम अभिनेत्री तमन्ना भाटियाला चिकन बिरयाणी खूप आवडायची. पण काही वर्षांपासून ती शुद्ध शाकाहारी झाली आहे.
अभिनेत्री धनुष देखील साकाहारी असून घरचं जेवण त्याला सर्वाधिक आवडतं. साऊथ इंडियन इडली, डोसा, सांभार याचे आवडते पदार्थ आहेत.
बॉलिवूडची ड्रिम गर्ल हेमा मालिनी देखील नैसर्गिक फळ आणि हिरव्या भाज्या खाते. ती देखील शुद्ध शाकाहारी आहे.