मराठी मनोरंजनसृष्टीत ऐतिहासिक भूमिका साकारून घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड. तिने आतापर्यंत विविध मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं आहे.
अमोल कोल्हेंच्या 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. या मालिकेत प्राजक्ताने महाराणी येसूबाई ही भूमिका साकारली होती.
सध्या ती ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्यामध्ये काम करत आहे. नुकतंच प्राजक्ताने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे.
प्राजक्ताने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत प्राजक्ताने गळ्यात आयडी, ब्लेझर परिधान केला आहे.
प्राजक्ता छान मार्कांनी पास होत इंजिनिअर झाली आहे. तिने फोटो शेअर करताना 'कॉम्प्युटर इंजिनिअरींग शिक्षण (Computer Engineering) पूर्ण केले. डिस्टिंक्शनसह प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादन केली. ( CGPA : 8.77 ), इंजिनिअर अभिनेत्री' अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
प्राजक्ताव्हा या पोस्टवर चाहते तिला शुभेच्छा देत आहेत. अनेकांनी तिच्या पोस्टवर ‘ताई शुभेच्छा’ असे कमेंट करत म्हटले आहे.
शूटिंग सांभाळत सेटवर अभ्यास करत प्राजक्ताने हे यश मिळवलं आहे. त्यामुळं चाहत्यांना तिचं खूपच कौतुक वाटत आहे.