स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता गायकवाड.
फार कमी वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण करून आपली ओळख निर्माण करणाऱ्या प्राजक्तानं नुकतीच एक गुड न्यूज दिली आहे.
प्राजक्ताने तिचं स्वत:चं नवीन घर खरेदी केलं. हे तिचं दुसरं घर आहे. आधी डिसेंबर 2022मध्ये देखील तिनं नवं खरेदी केलं होतं.
नवीन घराचं स्वप्न पूर्ण झालं. मेहनतीचं फळ मिळालं, असं म्हणत तिनं घराचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केलेत.
सोशल मीडियावर नव्या घराचा व्हिडीओ शेअर करताच प्राजक्ताला चाहत्यांनी शुभेच्छा देत तिचं अभिनंदन केलंय.