Swara Bhaskar: सब्यासाची, मनीष मल्होत्राला डावलत स्वरा भास्करने का केली पाकिस्तानी डिझायनरची निवड? कोण आहे तो?
अभिनेत्री स्वरा भास्कर सध्या तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. आधी कोर्टमॅरेज केलेल्या स्वरानं नंतर धुमधडाक्यात फहादशी लग्नगाठ बांधली. पण आता तिने लग्नासाठी निवडलेल्या लेहंग्याची चर्चा होत आहे. स्वरा भास्करने आपल्या लग्नाचा लेहंगा एका पाकिस्तानी डिझायनर कडून तयार करून घेतला आहे. यामुळे सध्या स्वरा खूपच ट्रोल होत आहे. पण तिने निवड केलेला हा पाकिस्तानी डिझायनर नक्की कोण आहे जाणून घ्या...
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनं फहाद अहमदसोबत लग्नगाठ बांधली. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
2/ 10
स्वरानं आधी कोर्टात लग्न केलं. त्यानंतर दोघांनी पारंपरिक पद्धतीनं लग्न केलं. हळदी, मेहंदी, संगीत असे सगळे कार्यक्रम धुमधडाक्यात पार पडले.
3/ 10
या लग्नाच्या फोटोंमध्येही स्वरा फार सुंदर दिसत होती. तिला अनेकांनी शुभेच्छा दिल्या. पण आता पुन्हा एकदा स्वरा सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसतेय.
4/ 10
स्वरा भास्करने आपल्या लग्नाचा लेहंगा एका पाकिस्तानी डिझायनर कडून तयार करून घेतला आहे. यामुळे सध्या स्वरा खूपच ट्रोल होत आहे.
5/ 10
स्वराने आपल्या रिसेप्शनसाठी पाकिस्तानी डिझायनर अली झिशान याच्या कलेक्शनमधील लेहंगा निवडला होता.
6/ 10
स्वराचे या लेहंग्यातील फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. स्वरा भास्कर हिनं वलीमासाठी मनीष मल्होत्रा, सब्यासाचीसारख्या डिझायनरची निवड न करता तिनं पाकिस्तानच्या डिझायनरला पसंती दिल्यानं तिला ट्रोल केलं जातंय.
7/ 10
स्वराने निवड केलेला डिझायनर अली झिशान हा पाकिस्तानात खूप लोकप्रिय आहे. मध्यंतरी युनायटेड नेशन्स वुमन पाकिस्तान साठी डिझायनर अली झिशानने 'नुमाईश' नावाची कथा सादर करत हुंडाबळीवर भाष्य केलं होतं.
8/ 10
अली झिशान यांचं हे फोटोशूट चर्चेचा विषय ठरलं होतं.
9/ 10
स्वरा भास्कर नेहमीच इतरांपेक्षा वेगळं काहीतरी करण्यासाठी ओळखली जाते.
10/ 10
यावेळी कुठल्याही भारतीय डिझायनर न निवडता पाकिस्तानी डिझायनरने तयार केलेला लेहंगा घातल्याने ती नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे.