छोट्या पडद्यावरील मराठी मालिका चांगल्याच गाजतात. त्यातील नायक आणि नायिका प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करतात. पण हे नायक एका एपिसोडसाठी किती पैसे आकारतात हे तुम्हाला माहितीये का?
स्वप्नील जोशी सौरभच्या भूमिकेसाठी एका भागासाठी 60 ते 70 हजार रुपये मानधन आकारतो. एवढं मानधन घेणारा तो एकमेव अभिनेता आहे.
चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर श्रेयस पुन्हा छोट्या पडद्यावर परतला. सध्या तो 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेत यशच्या भूमिकेत प्रेक्षकांची मन जिंकत आहे.