अमिताभ यांची मुख्य भूमिका असलेला 'सूर्यवंशम' हा ऑल टाइम हिट चित्रपट आहे. आजही या चित्रपटाची लोकप्रियता कमी झालेली नाही.
अमिताभ बच्चन यांचा 'सूर्यवंशम' या चित्रपटाची कथा आता घराघरातील लहान मुलांना देखील ठाऊक झाली असेल. पण अमिताभ बच्चन यांनी हा चित्रपट करण्यापूर्वी इंडस्ट्रीतील अर्ध्याहून अधिक अभिनेत्यांनी हा चित्रपट नाकारला होता.
'सूर्यवंशम'च्या मुख्य भूमिकेसाठी एक-दोन नव्हे तर 12 स्टार्सना अप्रोच करण्यात आले होते, मात्र या सर्वांनी सिनेमात काम करण्यास नकार दिला होता. या यादीत सनी देओल, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, गोविंदा, सलमान खानपासून ते आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगणपर्यंतच्या नावांचा समावेश आहे.
अमिताभ बच्चन यांच्या 'सूर्यवंशम' या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक 1999 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मुख्य अभिनेता पिता-पुत्राची भूमिका साकारणार होता. जेव्हा कलाकारांनी चित्रपटाची कथा ऐकली तेव्हा ते तरुण भूमिका साकारण्यास तयार होते, परंतु 'ठाकूर भानू प्रताप'ची भूमिका कोणालाच करायची नव्हती.
यामुळेच या सर्व अभिनेत्यांनी हा चित्रपट नाकारला, नंतर अमिताभ बच्चन यांनी चित्रपट स्वीकारला आणि दुहेरी भूमिका साकारून चित्रपट पूर्ण झाला.
या चित्रपटासाठी सनी देओल, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, गोविंदा, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार, अजय देवगण, सुनील शेट्टी आणि सैफ अली खान यांना आधी विचारण्यात आलं होतं
आदिेशगिरी राव यांनी सूर्यवंशमची निर्मिती केली होती. चित्रपटाची कथा विक्रमणची होती, जो त्याचे दिग्दर्शनही करणार होता, पण नंतर दिग्दर्शन ईव्हीव्ही सत्यनारायण यांनी केले. 90 च्या दशकाच्या उत्तरार्धात बनलेल्या सूर्यवंशम चित्रपटाचे बजेट फक्त 7 कोटी होते, तर चित्रपटाने 12.65 कोटींची कमाई केली होती.
या चित्रपटाला समीक्षकांनी दाद दिली नाही आणि बॉक्स ऑफिसवरही हा चित्रपट फ्लॉप ठरला, पण हा चित्रपट टीव्हीवर हिट झाला.