advertisement
होम / फोटोगॅलरी / मनोरंजन / Fathers Day 2023 : वडिलांच्याही एक पाऊल पुढे आहेत 'हे' स्टारकिड्स; हिट चित्रपट देऊन गाजवलं घराण्याचं नाव

Fathers Day 2023 : वडिलांच्याही एक पाऊल पुढे आहेत 'हे' स्टारकिड्स; हिट चित्रपट देऊन गाजवलं घराण्याचं नाव

आज आम्ही तुम्हाला त्या दिग्गज अभिनेत्यांच्या मुला-मुलींबद्दल सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांच्यापेक्षा जास्त प्रसिद्धी मिळवली आणि स्वतःचे स्टारडम निर्माण केले. या यादीत सनी देओलपासून ते हृतिक रोशन, करिश्मा-करीना कपूर आदी अनेक नावांचा समावेश आहे, जे आजही प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करत आहेत.

01
आज फादर्स डे निमित्त जाणून घेऊया या बॉलिवूडमधील बाप लेकांच्या हिट जोड्यांबद्दल...

आज फादर्स डे निमित्त जाणून घेऊया या बॉलिवूडमधील बाप लेकांच्या हिट जोड्यांबद्दल...

advertisement
02
1983 मध्ये रिलीज झालेल्या 'बेताब' चित्रपटातून प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या सनी देओलने आपल्या 40 वर्षांच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

03
 असे म्हटले जाते की, जेव्हा सनी त्याचे वडील यांच्याप्रमाणे चित्रपटात पाऊल ठेवण्याच्या तयारीत होता, तेव्हा लोकांनी त्याची शरीरयष्टी पाहून लोकांनी त्याची खिल्ली उडवली होती. मात्र, सनीने या गोष्टी कधीच मनावर घेतल्या नाहीत आणि आपले काम करत राहिला. आणि हळुहळू त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि संवादफेकीने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.

असे म्हटले जाते की, जेव्हा सनी त्याचे वडील धर्मेंद्र यांच्याप्रमाणे चित्रपटात पाऊल ठेवण्याच्या तयारीत होता, तेव्हा लोकांनी त्याची शरीरयष्टी पाहून लोकांनी त्याची खिल्ली उडवली होती. मात्र, सनीने या गोष्टी कधीच मनावर घेतल्या नाहीत आणि आपले काम करत राहिला. आणि हळुहळू त्याने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने आणि संवादफेकीने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली.

advertisement
04
 शाहिद कपूर हा अभिनेता पंकज कपूरचा मुलगा आहे. पंकज कपूर एक प्रतिभावान अभिनेता आहे, त्याने टेलिव्हिजन, हिंदी चित्रपट आणि थिएटरमध्ये देखील काम केले आहे. त्यांनी अनेक राष्ट्रीय पुरस्कार जिंकले असतील पण त्यांनी मुख्य भूमिकेत फार कमी चित्रपट केले. तर त्यांचा मुलगा शाहिद कपूरचे बॉलिवूडमध्ये मोठे नाव आहे.

05
शाहिद कपूरने स्वतःचे स्टारडम बनवले आहे. बॉलिवूडमध्ये त्यांची वेगळी ओळख आहे. शाहिद विवाह, जब वी मेट, हैदर, कमिने, कबीर सिंग, आर... राजकुमार, उडता पंजाब यासारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखला जातो.

06
 अभिनेता आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांचा मुलगा हृतिक रोशन हा बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. हृतिकला भलेही नेपो किड म्हटले जाईल, पण सत्य हे आहे की प्रेक्षकांमध्ये हृतिकची ओळख त्यानेच निर्माण केली आहे. कहो ना प्यार या चित्रपटाच्या बंपर यशानंतर हृतिकने अनेक हिट चित्रपट दिले.

07
  या यादीत करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांचीही नावे आहेत. रणधीर कपूर आणि बबिता कपूर यांच्या या दोन लाडक्या मुली बॉलीवूडमध्ये त्यांची वेगळी निर्माण करण्यात आणि स्टारडम राखण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

08
 करीना कपूरने रेफ्युजी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तर करिश्माचा पहिला चित्रपट 'प्रेम कैदी' हा होता.

  • FIRST PUBLISHED :
  • आज फादर्स डे निमित्त जाणून घेऊया या बॉलिवूडमधील बाप लेकांच्या हिट जोड्यांबद्दल...

    MORE
    GALLERIES