1990 ते 1999 हा काळ बॉलिवूड सिनेसृष्टीसाठी चांगला काळ मानला जातो. 70-80च्या दशकातील कलाकारांना टक्कर देण्यासाठी या काळात तरूण अभिनेते सज्ज झाले होते. ज्यात गोविंदा, सुनील शेट्टी, संजय दत्त, सनी देओल, तिन खान, अक्षय कुमार, अजय देवगण या कलाकारांचा समावेश होता. या सगळ्यांनी आपल्या सिनेमांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
अभिनेता सुनील शेट्टी म्हणजेच बॉलिवूडचा अण्णा. अभिनेत्यानं 90च्या दशकात एकाहून एक हिट सिनेमात काम केलं. ज्यात मोहरा, भाई, रक्षक, बॉर्डर, दिलवाले सह अनेक सिनेमांचा समावेश आहे. त्यावेळी सुनील शेट्टी एका सिनेमासाठी 20 लाख रुपये मानधन घेत होता.
सलमान खान आज स्वत:चं प्रोडक्शन हाऊस चालवतोय. पण 90च्या दशकात सलमान खान 20-25 लाख रुपये मानधन स्वीकारत होता.
दिलजले, जान, जिगर, विजयपथ, हम दिल दे चुके सनम, इतिहास, कच्चे धागे सारखे हिट सिनेमे 90च्या काळात अभिनेता अजय देवगण याने दिले. या काळात तो जवळपास 30 लाख रुपये मानधन घेत होता.
अभिनेता शाहरूख खान 90च्या दशकात एक रोमँटिक, चॉकलेट बॉय अभिनेता होता. शाहरूखने साकारलेला राहुल या काळात चांगलाच प्रसिद्ध होता. शाहरूख खान 90च्या दशकात 30 लाख रुपये मानधन घेत होता.
मिस्टर परफेक्शनिस्ट अभिनेता आमिर खान तेव्हा 30-35 लाख रुपये मानधन घेत होता. 90चा काळ त्यासाठी गेम चेंजर ठरला. अनेक हिट सिनेमे त्याने या काळात केले.
तर अभिनेता अक्षय कुमार त्याकाळचा अँक्शन हिरो होता. त्याच्या अँक्शननं 90चा काळ चांगलाच गाजवला होता. अक्षय कुमार 30-40 लाख रूपये मानधन घेत होता.
90 दशकातील कलाकारांचा विचार केला की त्यात पहिलं नाव हे अभिनेता गोविंदाचं येतं. कमाल अभिनय, हटके डान्स, अँक्शन, रोमान्सने भरलेल्या अनेक सिनेमांत गोविंदा तेव्हा काम करत होता. त्याचा हिरो नंबर 1 चांगलाच गाजला होता. या काळात गोविंदा 60 लाख रुपये मानधन घ्यायचा.
अभिनेता संजय दत्तनं देखील 90च्या दशकात अनेक हटके सिनेमात काम केलं. अनेक सिनेमात त्यानं निगेटीव्ह भुमिका केल्या. संजय दत्तचे सडक, साजन, नाम, खलनायक, वास्तव सारखे अनेक सिनेमे चांगलेच गाजले. संजय दत्त तेव्हा 80 लाख रुपये मानधन आकारत होता.
अभिनेता सनी देओलचा 90च्या दशकात चांगलाच दबदबा होता. सनीला पाहण्यासाठी थिएटरच्या बाहेर रांगा लागायच्या. सनी देओल त्याकाळचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता होता. बॉर्डर सिनेमासाठी त्यानं 90 लाख रुपये मानधन घेतलं होतं.