बॉलीवूड अभिनेता सनी देओलचा मोठा मुलगा करण देओलने अखेर 18 जून रोजी त्याची गर्लफ्रेंड द्रिशा आचार्यसोबत लग्नगाठ बांधली आहे.
या जोडप्याने आजी-आजोबा धर्मेंद्र आणि प्रकाश कौर यांच्या लग्नाच्या वाढदिवशी साखरपुडा केला होता आणि आज या जोडप्याने लग्न केले आहे.
दोघांच्या लग्नाचे फोटोही समोर आले आहेत. ज्यामध्ये द्रिशा लाल लेहंग्यामध्ये आणि करण देओल आयव्हरी शेरवानीमध्ये शोभून दिसत आहे.
द्रिशा आणि करणच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये करण आणि दिशाच्या चेहऱ्यावरचा आनंदही स्पष्ट दिसत आहे.
करण-द्रिशाच्या लग्नात त्याचे वडील सनी देओल, आजोबा धर्मेंद्र आणि काका बॉबी देओल, अभय देओल आणि इतर पाहुणे सहभागी झाले होते. यादरम्यान धर्मेंद्र देखील स्वतःला डान्स करण्यापासून रोखू शकले नाहीत. यावेळी देओल कुटुंबातील सर्व पुरुष पगडी घातलेले दिसले.