बॉयकॉट बॉलिवूडमुळे मागच्या काही महिन्यात अनेक सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले.
2/ 12
शाहरुख खान, सलमान खान रणबीर कपूर, आमिर खानचे सिनेमे सुपर फ्लॉप झाले.
3/ 12
#boycottbollywood या ट्रेंडनं बॉलिवूडचे पुरते बारा वाजवून टाकले.
4/ 12
उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर बॉलिवूड कलाकारांनी आपली व्यथा मांडली.
5/ 12
बॉलिवूडला बदनाम करण्याचं शडयंत्र सुरू असल्याचं अभिनेता सुनील शेट्टी यानं म्हटलं आहे.
6/ 12
तसंच हॅशटॅग बॉयकॉट बॉलिवूड हे प्रकरण थांबायला हवं असं आवाहन केलंय.
7/ 12
योगी आदित्यनाथ आज मुंबईत आले होते. तेव्हा बॉलिवूडच्या कलाकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्याबरोबर बैठक झाली. या बैठकीत अभिनेता सुनील शेट्टीनं बॉलिवूडच्या सद्यपरिस्थिती मुद्दा मांडला.
8/ 12
सुनील शेट्टी म्हणाला, 'एक हॅशटॅग सुरू आहे. #boycottbollywood हा ट्रेंड आपल्याला सांगण्यानेच कमी होऊ शकतो'.
9/ 12
'लोकांपर्यंत हे पोहोचणं गरजेचं आहे की, आम्ही खूप चांगली कामही करून झालो आहोत. आमच्या कोणातील एकामध्ये त्रुटी असू शकतात. पण त्यात सगळ्यांना त्यात गणनं चुकीचं आहे'.
10/ 12
'बॉलिवूड, हिंदी सिनेमे म्हणजे चांगले नाहीत ही प्रेक्षकांची समजूत झाली आहे. मी बॉर्डरसारख्या सिनेमात काम केलं आहे. खूप चांगले सिनेमे याआधी बॉलिवूडमध्ये येऊन गेले आहेत'.
11/ 12
'मी सुनील शेट्टी बनलो असेन तर ते फक्त युपीमुळे. बॉलिवूडला बॉयकॉट पासूनही तुम्हीच वाचवू शकता', असंही सुनील शेट्टी म्हणाला.
12/ 12
'मी सुनील शेट्टी बनलो असेन तर ते फक्त युपीमुळे. बॉलिवूडला बॉयकॉट पासूनही तुम्हीच वाचवू शकता', असंही सुनील शेट्टी म्हणाला.