या मालिकेच्या निमित्तानं पहिल्यांदा प्रमुख भूमिकेत एक प्लस साइज अभिनेत्री दिसली. प्रमुख भूमिकेतील सुढौल, झिरो फिगर अभिनेत्रींची चौकट मोडून या मालिकेनं नवा पायंडा घातला.
सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेसाठी आणि लतिका या पात्रासाठी अभिनेत्री अक्षया नाईकला सर्वोत्कृष्ट स्फूर्तिदायक स्त्री व्यक्तिरेखा असा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
पुरस्कार मिळताच अक्षयानं पोस्ट शेअर करत तिच्या भावना व्यक्त केल्यात. तिनं म्हटलंय, तुमच्या खऱ्या आयुष्यात तुम्ही प्रमुख पात्र व्हा. मला सर्वोत्कृष्ट स्फूर्तिदायक स्त्री व्यक्तिरेखा म्हणून पुरस्कार मिळाला.
मला अभिनेत्री व्हायचं होतं. तेव्हा मनात एकच प्रश्न घोळत होता की एखाद्या जाड मुलीला कशा भूमिका मिळतील? सिनेमात फक्त साइड रोल किंवा बर्गर खाणारी एक जाड मैत्रिण किंवा एक जाड मैत्रीण जिची सगळे खिल्ली उडवतील.
पण मला आनंद आहे की मी माझ्या भूमिकेनं अनेक तरूण मुली आणि मुलांच्या मनातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना मदत करत आहे.