मराठमोळा अभिनेता सुबोध भावेसह अनेक कलाकारांच्या घरी बाप्पा विराजमान झाले आहेत. सुबोधच्या घरी बाप्पाची छोटी मुर्ती स्थापन करण्यात आलीये.
सुबोध त्याची पत्नी मंजिरी आणि दोन्ही मुलं कान्हा आणि मल्हार दरवर्षी मोठ्या उत्साहात गणपती घरी आणतात. भावेंच्या घरातील गणपतीची आरसही दरवर्षी खास असते.
सुबोधची दोन्ही मुलं त्याच्यासारखीचं क्रिएटिव्ह आहेत. गेल्या वर्षी मुलांनी टोकियो ऑलिम्पिकचा देखावा स्वत: च्या हातानं बनवला होता.
यावर्षीही सुबोध भावेच्या घरच्या देखाव्याची कल्पना आणि सादरीकरण मुलांनी केलं आहे. यावर्षीची त्यांची थीमही नवी आणि वेगळी आहे.
निसर्गाचा सांभाळ केला तर आनंदी पृथ्वी आणि निसर्गाचा नाश केला तर दुःखी पृथ्वी, अशी संकल्पना डोक्यात ठेवून मुलांनी हा देखावा तयार केला.
मुलांनी तयार केलेला देखावा पाहून, 'नवीन पिढीला निसर्ग जपण्याचं महत्त्व कळतंय. निसर्ग जपण्याची बुध्दी आणि शक्ती आपल्या अंगी येवो हीच गणराया चरणी प्रार्थना', असं सुबोधनं म्हटलं आहे.
सुबोधच्या मुलांनी साकारलेल्या देखाव्याची संकल्पना खुपच सुंदर आहे. या वयात मुलांनी साकारलेल्या देखाव्याचं सोशल मीडियासह सर्वत्र कौतुक होत आहे.