Varun Tej and Lavanya Tripathi: वरुण तेज आणि लावण्या एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखतात. आता दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. खास लोकांच्या उपस्थितीत दोघांनी 9 जून रोजी साखरपुडा केला, आता दोघांच्या साखरपुड्यापेक्षा अंगठीची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. .(varun tej/instagram)
वरुण आणि लावण्याने साखरपुड्याचे काही सुंदर फोटो शेअर केले होते. यातील एका फोटोमध्ये दोघांचा हात दिसत असून त्यात आकर्षक साखरपुड्याची अंगठी दिसत आहे.
वरुण आणि लावण्याच्या साखरपुड्यानंतर आता दोघांची रिंग चर्चेत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, दोघांनी घातलेल्या अंगठ्या खूप महाग आहेक. एका अंगठीची किंमत 25 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजे दोघांच्या अंगठीची एकूण किंमत 50 लाख रुपये आहे.
अंगठीची किंमत समोर आल्यानंतर लोक म्हणतायत या किंमतीत एक लक्झरी कार आली असती. सध्या सोशल मीडियावर याचीच चर्चा रंगलेली आहे.
केवळ अंगठीच नाही तर लावण्याच्या साडीची किंमतही लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. लावण्यने साखरपुड्यासाठी अनामिकाने डिझाइन केलेली पेस्टल ग्रीन कलरची बनारसी साडी परिधान केली होती. या साडीची किंमत 25 हजार रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
लवाण्य आणि वरुणने साखरपुड्यानंतर एक फोटो शेअर केला, ज्याद्वारे त्यांनी सर्वांना 'थँक यू' म्हटले. या दोघांचा हा फोटो सोशल मीडियावरही चांगलाच चर्चेत आहे.