बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची चुलत बहीण आणि 'द फॅमिली मॅन' या वेब सीरिजनंतर सर्वत्र चर्चेत आलेली अभिनेत्री प्रियामणी सध्या तिच्या आगामी 'जवान' चित्रपटामुळे चर्चेत आहे.प्रियामणीचे चाहते तिला शाहरुख खानसोबत पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत. प्रियामणी ही दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्री आहे जी ऑनस्क्रीन किसिंग किंवा इंटिमेट सीन देणे टाळते. प्रियामणी हिनं आजपर्यंत चित्रपटांमध्ये नो किसिंग पॉलिसी जपली आहे. नो किसिंग पॉलिसीमागं अनेक कारणं आहेत, याबाबत अभिनेत्रीने एक खुलासा केला आहे.
प्रियामणीनं फक्त साऊथचं नाही तर बॉलिवू़डमध्ये देखील तिच्या अभिनयाच ठसा उमठवला आहे. प्रियामणी नेहमीच इंटिमेट सीन देण टाळते. तिनं तिच्या कॉन्ट्रेक्टमध्ये नो किसिंग पॉलिसी क्लॉज अॅड केला आहे. तिनं हा निर्णय का घेतला आहे, याचा खुलासा अभिनेत्रीनं केला आहे.
'जवान' फेम अभिनेत्रीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले की, तिला अनेक प्रोजेक्ट्सच्या ऑफर होत्या, ज्यामध्ये तिला इंटिमेट सीन करण्याची गरज होती. पण तिनं या ऑफर नाकारल्या. ऑनस्क्रीन किसिंग सीन देणं ज्याची त्याची आवड आहे.
'नो किसिंग' पॉलिसीबाबत प्रियामणी पुढे म्हणाली, 'मी ऑनस्क्रीन किस करणार नाही. यासाठी मी नेहमीच नाही म्हटलं आहे. ती म्हणाली की, मला माहिती आहे की, माझे हे काम आहे पण असं ऑनस्क्रीन एकाद्या पर पुरूषाला कीस करणं मला योग्य वाटत नाही. कारण माझं लग्न झालेलं आहे आणि घरी गेल्यावर मला देखील माझ्या नवऱ्याला उत्तर द्यावे लागते.
ती पुढे म्हणाली की, मला माहिती आहे माझा सिनेमा जेव्हा रिलीज होईल तेव्हा माझी दोन्ही कुटुंब हे सगळं पाहतील. त्यांना माहिती आहे की हे माझे काम आहे. पण मलाच असं करणं योग्य वाटत नाही. घरच्यांना वाटेल आपली सून लग्नानंतर देखील असे सीन का देत आहे, किंवा हे सगळं करत आहे ? माझ्या घरचे मला काही बोलणार नाहीत पण ही माझी पर्सनल चॉईस आहे, असं देखील ती म्हणाली.
प्रियमणीने 23 ऑगस्ट 2017 रोजी मुस्तफा राजसोबत लग्नगाठ बांधली आहे. दोघांचे लग्न हा एक खाजगी सोहळा होता, जिथे दोघांनी आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला
साऊथशिवाय प्रियामणीने बॉलिवूडमध्येही काम केले आहे. ती 'रावण', 'रक्तचरित्र 2', 'चेन्नई एक्सप्रेस', 'अतीत' आणि 'सलाम वेंकी'मध्ये दिसली असून आता प्रियमणी लवकरच शाहरुख खानच्या 'जवान' आणि अजय देवगणसोबत 'मैदान'मध्ये दिसणार आहे.