साऊथ इंडियन अभिनेता मोहनलाल यांच्या नावे या सिनेमांचा रेकॉर्ड आहे. मोहनलाल यांची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. त्यांच्या 40 वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी 340 हून अधिक सिनेमात काम केलं आहे. मोहनलाल हे नाव फक्त आणि फक्त हिट सिनेमांसाठीच प्रसिद्ध झालं.
मोहनलाल यांनी 1986मध्ये नवा रेकॉर्ड तयार केला होता. एका वर्षात त्यांनी जवळपास 34 सिनेमे साइन केले. त्यातील 25 सिनेमे टोटल हिट झाले. एका वर्षात इतके सिनेमे आणि सगळ्या सिनेमात प्रमुख भूमिका करण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावे नोंदवण्यात आला आणि हा रेकॉर्ड आजही कायम आहे.
1978मध्ये मोहनलाल यांनी थिरानोट्टम या सिनेमातून पदार्पण केलं. त्यानंतर राम गोपाल वर्माच्या फिल्म कंपनीतून ते बॉलिवूडमध्ये आले. 2002मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांमध्ये मोहनलाल यांचा सिनेमा होता. ज्यात त्यांनी पोलीस कमिशनर वीरप्पलिल श्रीनिवासन ही भूमिका साकारली होती.
2012मध्ये कंपनी या सिनेमानं 10 वर्ष पूर्ण केली. तेव्हा सिनेमाचा निर्माता राम गोपाल वर्माने खुलासा करत म्हटलं होतं कीस अजय देवगण आणि विवेक ओबेरॉय हे मोहनलाल याच्या अभिनयानं इंम्प्रेस झाले होते. त्याच्या अभिनयाचं सर्वांनी कौतुक केलं होतं.
दशरथम, थूवनथुंबिकल, नाडोडिकटू सारख्या सिनेमांसाठी मोहनलाल ओळखले जातात. अमिताभ बच्चन यांच्या आग आणि तेझ या बॉलिवूड सिनेमातही मोहनलाल यांनी काम केलं होतं.
मोहनलाल यांच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं तर ते रजनीकांत यांच्या आगामी जेलर सिनेमात दिसणार आहे. मुळ तमिळ भाषेत असलेला हा सिनेमा 11 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे. मोहनलाल यांचं वय 63 वर्ष आहे. पण आजही ते फार हँडसम दिसतात. मरक्कम सारख्या सिनेमात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. या सिनेमानं रिलीज आधीच 100 कोटींची कमाई केली होती.