बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आपल्या व्यावसायिक आयुष्यासोबतच आपल्या खाजगी आयुष्यामुळेही चर्चेत असते. सध्या चित्रपटांपासून दूर असणारी सोनम अतिशय आलिशान लाईफ जगते.
लग्झरी कारपासून ते महागड्या घरापर्यंत सोनमच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा होत असते. सोनमने स्वतः च्या ताकतीवर कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे.
अभिनेत्री सोनम कपूरने नुकतंच आपल्या एका आलिशान अपार्टमेंटची विक्री केली . मुंबईमध्ये असलेलं हे अपार्टमेंट सोनमने तब्बल 32 कोटीला विकलं आहे.
सोनम कपूरच्या या आलिशान घराची बरीच चर्चा सुरु आहे. मनी कंट्रोलच्या रिपोर्ट्सनुसार, हा 5 हजार 533 वर्ग फुटात बनवण्यात आलं आहे.
तसेच रिपोर्ट्सनुसार, वांद्रे कुर्लामध्ये असलेल्या या फ्लॅटमध्ये 4 पार्किंग स्लॉट आहेत. तसेच हा फ्लॅट अत्याधुनिक सोयी सुविधांयुक्त आहे.
सोनम कपूरने 2015 मध्ये हा फ्लॅट 18 कोटींमध्ये खरेदी केला होता. त्यानंतर आता 7 वर्षानंतर अभिनेत्रीने तब्बल 32 कोटीला हा फ्लॅट विकला आहे.
सोनम कपूर एक उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय ती एक हुशार उद्योजिकासुद्धा आहे. त्यामुळे तिला गुंतवणुकीतील नफा तोटा चांगल्याप्रकारे समजतो.