अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या लग्नाची पुन्हा एकदा जबरदस्त चर्चा होताना दिसत आहे. सोनाली आणि कुणालचा लग्नसोहळा सध्या प्रेक्षक आणि चाहते ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्जॉय करत आहेत.
सोनालीने महामारीच्या काळात रजिस्टर लग्न केलं आणि कोरोनाचा हाहाकार काहीसा कमी झाल्यावर कुटुंबियांसोबत तिचा थाटामाटात जंगी विवाहसोहळा पार पडला.
सोनालीने दोनदा केलेला हा लग्नसोहळा तिला तिच्या चाहत्यांशी शेअर करायचा होता म्हणून तिने खास आपल्या लग्नाची एक छोटीशी मालिका बनवायचं ठरवलं.
सध्या या मालिकेचं तुफान प्रमोशन चालू आहे मात्र आता चाहत्यांना यामध्ये नावीन्य न दिसता कन्फयुजन होऊ लागलं आहे.
सोनाली नेमकं किती वेळा लग्न करतेय? असा प्रश्न तिला सारखा विचारला जात आहे तर तिने नुकत्याच शेअर केलेल्या हळदीच्या काही खास फोटोंवर चाहते कमेंट करताना दिसत आहेत.
“मॅडम अजून किती वेळा लग्न करणार?” अशी कमेंट एका युजरने केली आहे. तर अनेकांना तिचं लग्न आत्ता होत आहे का? असं सुद्धा वाटतंय.
सोनालीच्या या लग्नमालिकेचा अतिरेक झाल्याचं सुद्धा अनेकांचं म्हणणं आहे तर काहींना तिचा हा प्रयत्न फारच आवडला आहे.
सध्या सोनाली आणि कुणालची वेडिंग स्टोरी हा सगळीकडे चर्चेचा विषय ठरतो आहे. तिचे काही खास फोटो आणि खास लुक सुद्धा बरेच प्रसिद्ध होत आहेत.