बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा अभिनेत्री कियारा अडवाणी आपल्या लग्नानंतरसुद्धा सतत चर्चेत आहेत. या जोडप्याने 7 फेब्रुवारीला राजस्थान, जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये सात फेरे घेतले आहेत. या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावरील सर्वात जास्त व्ह्यूज मिळविलेले फोटो ठरले आहेत. दरम्यान आता अभिनेत्री कियारा अडवाणीचं मंगळसूत्र प्रचंड चर्चेत आलं आहे. सोन्याच्या चेनमध्ये काळ्या मणी आणि मध्ये डायमंड अशी डिझाईन असलेलं कियाराचं मंगळसूत्र प्रचंड पसंत केलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कियारा अडवाणीचं मंगळसूत्र प्रसिद्ध डिझायनर सब्यसाचीने डिझाईन केलं आहे. कियाराच्या या मंगळसूत्राची किंमत तब्बल 2 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. सिद्धार्थने आपल्या पत्नीच्या मंगळसूत्रसाठी तब्बल 2 कोटी मोजले आहेत.