मनसेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे भव्य दीपोत्सव आयोजित करण्यात आला आहे. संपूर्ण शिवाजी पार्क रोषणाईनं उजळून गेला आहे.
नुकतंच अभिनेत्री प्राजक्ता माळीनं राज ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिवळीच्या शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्राची हास्यजत्राचे कलाकर तसंच ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, वंदना गुप्ते, निवेदिता सराफ हे कलाकारही उपस्थित होते.
प्राजक्ता माळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटल्यानंतर तिच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
दरम्यान प्राजक्ता माळीनंतर अभिनेता सिद्धार्थ जाधव तसेच अनेक मराठी कलाकारही शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.
राज ठाकरेंनी सिद्धार्थच्या जाधवच्या खांद्यांवर हात ठेवून काढलेल्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.
शिवतीर्थावर साकारला गेलेला दिव्य अतिभव्य दीपोत्सव आणि या संकल्पनेच्या उदघाटनाला उपस्थित राहण्याचा संधी मराठी कलाकारांना मिळाली. यावेळी अभिनेते महेश मांजरेकर निर्माते अभिजीत पानसे, सचिन खेडेकर, पुष्कर श्रोत्रीसह अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते.
दिवाळीनिमित्तानं शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीला गेलेल्या सर्व मराठी कलाकारांचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.