दरम्यान शिव आणि वीणाचं प्रेम प्रकरण देखील चांगलंच गाजलं. पण आता वीणा नाही तर शिवला एका बॉलिवूड अभिनेत्रीबरोबर डेटला जायचं आहे.
शिव म्हणाला, "मला दीपिकाबरोबर मला डेटवर जायला आवडेल. पॅरिसच्या टॉवरमध्ये एक कॅफे आहे तिथे मला तिच्याबरोबर डेटला जायला आवडेल. आयफिल टॉवर उंच आहे दीपिका पण उंच आहे म्हणून तिथे जायला आवडेल".
शिव पुढे म्हणाला, "दीपिकाकडे पाहून असं वाटतं की जर तुम्हाला अभिनेत्री व्हायचं आहे तर दीपिका सारखी व्हा. मी तिला एका कार्यक्रमात भेटलो होतो. तिचा ऑराचं वेगळा आहे".
"दीपिका हॉलमध्ये आली. तिने कोणताच आवाज केला नाही. ती शांतपणे आत आली तेव्हा सगळ्यांच्या माना आणि नजरा तिच्याकडे वळल्या. दीपिकाने नेसलेली साडी, तिचा ऑरा याने ती सर्वांचं लक्ष वेधत होती", असं म्हणत शिवनं दीपिकाचं कौतुक केलं.