शिव ठाकरेनी 'बिग बॉस 16 मधून चांगलंच नाव कमावलं. शिव लवकरच खतरों के खिलाडी या शो मध्ये सहभागी होणार असून तो यंदाच्या सीझनमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक असल्याचं बोललं जातंय.
बिग बॉस नंतर शिवचं नशीब चमकलं असून त्याला मोठ्या सिनेमांच्या ऑफर आल्याची माहिती देखील समोर आली होती. तसंच शिवने पहिल्यांदाच स्वतःची नवीन आलिशान गाडी खरेदी केली आहे.
शिवने नुकत्याच एका मुलाखतीत त्याचे संघर्षाचे दिवस कसे होत ते सांगितलं आहे. ते ऐकून त्याचे चाहते भावुक झाले आहेत.
शिव ठाकरेने सांगितलं की, 'त्याचे वडील एक पान दुकान चालवत होते. तो आपल्या वडिलांसोबत या दुकानात काम करत असे. त्याची बहीणदेखील या कामात मदत करत असे. ते काम करण्यात त्याला आनंद मिळायचा'
इतकंच नव्हे तर घर चालवण्यासाठी त्याच्या बहिणीने आणि त्याने घराघरात वृत्तपत्रे आणि दूधदेखील विकलं आहे. शिवने सांगितलं काम केल्यानंतर वडील त्याला बाहेर खाण्यासाठी 5 रुपये द्यायचे, पण त्याला 20 रुपये लागायचे. अशा वेळी शिव ते 15 रुपये मेहनत करून कमवायचा.
त्यानंतर शिवने डान्स क्लास घेण्यास सुरुवात केली होती. यामध्ये त्याला 10 ते 22 हजारांपर्यंत पैसे मिळत असत. याचदरम्यान शिवने फिटनेसकडे लक्ष दिलं. आणि नंतर रोडीजमध्ये एन्ट्री केली होती.
शिव ठाकरे हा मूळचा अमरावतीचा राहणारा आहे. त्याने फारच कमी वेळेत आपली चांगली ओळख निर्माण केली आहे. रोडीजनंतर शिव मराठी बिग बॉसच्या दुसऱ्या सीजनमध्ये सहभागी झाला होता. शिव ठाकरे या सीजनचा विजेता ठरला होता.