'बिग बॉस 16' मध्ये आपल्या साधेपणाने आपल्या लोकांची मने जिंकणारा शिव ठाकरे लवकरच 'खतरों के खिलाडी 13' मध्ये दिसणार आहे.
त्याचं अभिनेत्री वीणा जगताप सोबत अफेअरच्या चर्चा रंगल्या होत्या, पण त्यांचं हे नातं फार काळ टिकलं नाही.
शिव ठाकरेचं नाव टीव्ही अभिनेत्री आकांक्षा पुरीसोबत जोडले जात आहे. शिव आकांक्षाला डेट करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.
आकांक्षाला 'विघ्नहर्ता गणेश' या शोमधून प्रसिद्धी मिळाली, ज्यामध्ये तिने 3 वर्षांपेक्षा जास्त काळ देवी पार्वतीची भूमिका केली होती. 2020 मध्ये तिने शो सोडला.
आकांक्षा पुरीने आता शिव ठाकरेसोबतच्या नात्याबाबत मौन सोडलं आहे. इंडिया फोरमला दिलेल्या मुलाखतीत तिने ही बातमी अफवा असल्याचे सांगितले.
आकांक्षा म्हणाली, “मला ही बातमी ऐकून हसू येत आहे. बातमी अजिबात योग्य नाही. शिव चांगला मुलगा आहे, खूप गोड आहे, खूप छान मुलगा आहे!!
आकांक्षा पुरी पुढे म्हणाली, “पण दुर्दैवाने नाही. मला छान लोक मिळत नाहीत." याआधी शिव ठाकरेनेही आपल्या रिलेशनशिप स्टेटसमध्ये आपणही सिंगल असल्याचे सांगितले होते.