शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर 'चक दे इंडिया' या चित्रपटातून प्रसिद्धीस आलेली कोमल चौटेला अर्थातच अभिनेत्री चित्राशी रावत होय. चित्राशी रावत आता आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करत आहे. अभिनेत्रीने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्नगाठ बांधली आहे. चित्राशी रावत अभिनेता ध्रुवादित्य भागवनानीसोबत लग्न बंधनात अडकली आहे. या जोडप्याने आज ४ फेब्रुवारीला सात फेरे घेत छत्तीसगढमधील विलासपूर याठिकाणी जन्मगाठ बांधली आहे. चित्राशी आणि ध्रुवादित्यच्या लग्ना आधीच्या कार्यक्रमांचे फोटो देखील समोर आले आहेत. या दोघांची भेट प्रेमाई चित्रपटाच्या सेटवर झाली होती. गेल्या तब्बल ११ वर्षांपासून दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यांनतर आता या जोडप्याने लग्नगाठ चाहत्यांना खुश केलं आहे. आता अभिनेत्रीवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.