बॉलिवूडचे स्टार किड्स नेहमीच चर्चेत असतात. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान लोकप्रिय स्टारकिड्सपैकी एक आहे.
अजय देवगण आणि काजोल यांची मुलगी न्यासा देवगन देखील चर्चेत असते. पण आर्यन आणि न्यासा यांची जवळीक पाहून शाहरुख चांगलाच चिंतेत पडला होता.
एकदा करण जोहरने न्यासा देवगनचे नाव आर्यन खानसोबत जोडले तेव्हा शाहरुख खान चिंतेत पडला होता. शाहरुख खाननेही याबाबत चिंता व्यक्त केली होती.
आर्यन खानही आपल्या वडिलांप्रमाणेच फिल्म इंडस्ट्रीत आपले करिअर करत आहे. आर्यन खाननेही दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे.
2007 मध्ये शाहरुख खान आणि काजोल एकदा कॉफी विथ करणमध्ये पोहोचले होते. येथे एका प्रश्नात करण जोहरने शाहरुख खानला विचारले, 'जर आर्यन खान आणि न्यासा देवगन आजपासून 10 वर्षांनंतर डेट करू लागले तर तुमची प्रतिक्रिया काय असेल?'
या प्रश्नाला उत्तर देताना शाहरूख खान म्हणाला की, 'मला हा प्रश्न समजला नाही. या विचाराने मला ताण आला आहे. मला काजोलचा नातेवाईक व्हायला सुद्धा भीती वाटते. शाहरुख खानने हे सर्व गमतीने सांगितले होते. पण बॉलिवूडचा बादशाह या दोघांच्या नात्याबाबत चिंतेत दिसला होता.
करण जोहरने काजोललाही हाच प्रश्न विचारला होता. याला उत्तर देताना काजोल खूपच कम्फर्टेबल दिसत होती. याच प्रश्नावर काजोलने हसत हसत दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे असं उत्तर दिलं होतं.