बॉलीवूडचा 'चॉकलेट बॉय' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहिद कपूरने मीरा राजपूतसोबत लग्नगाठ बांधली. शाहिद आणि मीराचं लग्न ७ जुलै २०१५ रोजी झालं होतं.
शाहिद आणि मीरा कपूर 'मेड फॉर इच ऑदर' आहेत, परंतु प्रत्येक पती-पत्नीमध्ये जसे घडते, त्यांच्याही काही सवयी असतात ज्या त्यांना त्रास देतात. आता शाहिदने मीराच्या अशाच एका सवयीचा खुलासा केला आहे, ज्यामुळे तो खूप वैतागला आहे.
जेव्हा त्याला मीराच्या एका सवयीबद्दल विचारण्यात आले जी त्याला खूप त्रास देते, तेव्हा त्याने मीराच्या झोपण्याच्या सवयीबद्दल खुलासा केला. तो म्हणाला की मीरा सकाळी उठत नाही आणि सकाळी ९ वाजताही तिला उठवण्याचा प्रयत्न करत असताना ती कुरकुर करत राहते.
यानंतर शाहिद मीराच्या त्या सवयीबद्दल तक्रार करत पुढे म्हणाला, 'मीरा सगळ्याचं श्रेय स्वतःकडे घेते. उलट मलाच 'तुला सरळ करेन असं म्हणते.' असा खुलासा केला आहे.
यानंतर शाहिद कपूरने पत्नी मीराचे कौतुक करत तिच्याबद्दल अनेक चांगल्या गोष्टीही सांगितल्या. तो म्हणाला की 'मीरा जशी आहे तशीच मला आवडते. ती खरं तर खूप ठोस, प्रामाणिक आणि खरी आहे. आजकाल या गोष्टी फार कमी लोकांमध्ये पाहायला मिळतात.' असं तो म्हणाला.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर शाहिद कपूर 'फर्जी' वेब सीरिजमध्ये दिसला होता. राज आणि डीके दिग्दर्शित हा शो अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित झाला.
शाहिदचा अॅक्शन-थ्रिलर चित्रपट 'ब्लडी डॅडी' 9 जून रोजी OTT वर प्रदर्शित होत आहे. अली अब्बास जफरच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा शो तुम्ही जिओ सिनेमावर पाहू शकाल.